Wednesday, May 1, 2024

Latest Posts

BJP च्या भट्टीत शिवसैनिकांचा बळी, CM Eknath Shinde यांचा अभिमन्यु झालाय, Shivsena नेत्याचे गंभीर आरोप

शिवसेनेचे नेते सुरेश नवले यांनी भाजपवर गंभीर आरोप करत, "मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवले जात असून त्यांचा अभिमन्यु झालाय," असे वक्तव्य केले आहे. 'भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचा बळी जात आहे,' असे म्हणत त्यांनी घरचा आहेर दिला आहे.

आगमी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर देशभरात रणधुमाळी चालू आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा उद्यापासून (शुक्रवार, १९ एप्रिल) निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांवर महाविकास आघाडीचा (Mahavias Aghadi) जागावाटपाचा तिढा सुटला असला तरीही महायुतीमध्ये (Mahayuti) अजूनही काही जागांवरून वाद चालू आहेत. आता, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे नेते सुरेश नवले (Suresh Navale) यांनी भाजपवर गंभीर आरोप करत, “मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवले जात असून त्यांचा अभिमन्यु झालाय,” असे वक्तव्य केले आहे. ‘भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचा बळी जात आहे,’ असे म्हणत त्यांनी घरचा आहेर दिला आहे.

माजी मंत्री आणि शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते संजय नवले यांनी भाजपच्या नीतीवर ताशेरे ओढत अनेक गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “भाजपने कृपाल तुमाने, हेमंत पाटील, भावनाला गवळी यांचा बळी दिला आहे. भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत. हे महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांसाठी शोभादायक नाही. शिवसैनिकांना न्याय मिळत नाही म्हणून हा उठाव झाला. सगळे मुख्यमंत्र्यांसोबत बाहेर पडले आणि सरकार अस्तित्वात आले. ज्या कारणांसाठी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना सोडलं त्याच कारणांसाठी शिवसैनिकांना आता राग आहे. सामान्य शिवसैनिक सोडा विद्यमान खासदारांना आपली उमेदवारी मिळवता आली नाही, हे दुर्दैव आहे. मित्रपक्षांना सांभाळण्यासाठी, पोसण्यासाठी शिवसेनेवर जबाबदारी असल्याचे चित्र दिसत आहे.”

“तहाच्या बोलणीमध्ये भाजपकडून फसवणूक होत आहे. महाभारतात चक्रव्युहामध्ये अभिमन्यू अडकतो तशी अवस्था मुख्यमंत्र्यांची झाली आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी पक्ष तळागाळात गेलेला असेल आणि तसे झाले तर त्यातून पक्षाला बाहेर काढणं फार कठीण असेल. या सगळ्या स्थितीला महाराष्ट्राचं नेतृत्व कारणीभूत आहे. ते चतुर आणि चाणाक्ष आहेत. ज्या गोष्टी त्याच्याने शक्य नाहित त्या केंद्राकडून करून घेतल्या जात आहेत.” ते पुढे म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकांबाबत बोलताना नवले म्हणाले, “४८ जागांमध्ये अशी स्थिती भाजपने केली आहे तर २८८ जागेमध्ये काय करेल? विधानसभेची निवडणूक लागली तर भाजप संजय शिरसाठ यांचा आयबीचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे, अब्दुल सत्तार यांच्यावर सीबीआय चौकशी चालू आहे असे सांगून तिकीट नाकारले जाईल. ४० पैकि ३० आमदारांना तिकीट नाकारलं तर काय स्थिती होईल हे पाहून अंगावर काटा येतो.”

हे ही वाचा:

BJP कडून नव्या प्रसिद्ध चेहऱ्यांची चाचपणी सुरु, कोणता उमेदवार ठरणार सरस?। Ujjwal Nikam|Madhuri Dixit

Raj Thackeray यांचा पंतप्रधानांना पाठिंबा, दोघंही दिसणार एकाच मंचावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss