Saturday, July 27, 2024

Latest Posts

भाजप सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राला वाळवी लागली आहे, संजय राऊत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लबोल हा केला केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले म्हणाले आहेत की, सरकारचा महारोजगार मेळावा बारामतीमध्ये होत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लबोल हा केला केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले म्हणाले आहेत की, सरकारचा महारोजगार मेळावा बारामतीमध्ये होत आहे. ज्या विद्या प्रतिष्ठान येथे हा रोजगार मेळावा होत आहे, त्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. सरकारचा एक प्रोटोकॉल असतो कुठलाही सरकारी कार्यक्रम ठेवत असेल त्या ठिकाणचे विद्यमान खासदारांना आमंत्रण दिले जाते. तो सरकारी कार्यक्रम आहे, सीएम -डीसीएम यांच्या घरातील लग्नाचा कार्यक्रम नाही. हे हास्यास्पद आहे, हे कसले राजकारण आहे. मात्र शरद पवार यांनी त्यांना जेवण्याचे आमंत्रण दिले आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही सरकारमध्ये आमदार, खासदार हा आपल्या पक्षाचा नाही म्हणून त्याला कार्यक्रमात बोलवायचेच नाही का ? जो महारोजगार मेळावा आहे तो तुमच्या माता या पिताश्री यांचा आहे का सरकारचा आहे ? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

तसेच राऊत पुढे म्हणाले आहेत की, सरकारचा कार्यक्रम आहे. विद्यमान खासदार, आमदार त्या सरकारी योजनेचा भाग असतो. अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण भाजपचे देवेंद्र फडणवीस आल्यापासून महाराष्ट्रात सुरू झाले आहे. गटारातील राजकारण हे आतापासून महाराष्ट्रात सुरू झाले आहे ,हे याआधी कधीच नव्हते. आपल्याच आमदारांना निधी द्यायचा, विरोधी पक्षातील आमदारांना निधी द्यायचा नाही. आमदाराशी तुमचा वाद असेल ,मात्र जनतेचा काय ? हा कोणता खेळ चालला या राज्यात. पैसे काय तुमच्या झाडाला आले आहेत का ? तुमच्या झाडाला खोके लागलेत का ? वर्षा, सागर बंगला ,देवगिरी ,बारामती बंगल्यांवर झाडाला पैशांचे खोके लागले आहेत का? केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे दोन वीर, महानुभव सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राला वाळवी लागली आहे. बिहारमध्ये लाखो तेथील उपमुख्यमंत्र्यांनी तरुणांना थेट नियुक्तीपत्र दिले आहे असं देखील राऊत म्हणाले आहेत.

तर पुढे जागा वाटप संदर्भात बोलत असताना राऊत म्हणाले आहेत की, जागा वाटपा संदर्भात सकारात्मक निर्णय होईल अनेकांनी आपले प्रस्ताव दिले आहेत. एकत्र बसून आम्ही आकडे जाहिर करू , मात्र कोण येत नवीन नवीन आकडे देते त्याच्याशी आमचा संबंध नाही. वंचित बहुजन आघाडी आमच्याकडे महत्त्वपूर्ण आहे त्यांच्याशिवाय जागावाटप होणार नाही.

हे ही वाचा:

सनी लिओनी बनली गरजू मुलांसाठी सांता,गिफ्ट देत साजरा केला खास पद्धतीत ख्रिसमस

बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या ‘डंकी’ ची निराशाच,कमाईत अपयशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss