Friday, May 17, 2024

Latest Posts

कर्नाटकच्या निवडणुकांच्या वेळी बजरंग बलीचा आसरा घेण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला, जयंत पाटील

कर्नाटकच्या निवडणुकांच्या वेळी बजरंग बलीचा आसरा घेण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला, आता रामाचा आसरा घेण्याचा कार्यक्रम देशात सुरू आहे

निपाणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा तसेच नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी जोरदार हल्लबोल हा केला आहे. तसेच यावेळी बोलत असताना जयंत पाटील यांनी देखील हल्लाबोल केला आहे.

कर्नाटकच्या निवडणुकांच्या वेळी बजरंग बलीचा आसरा घेण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला, आता रामाचा आसरा घेण्याचा कार्यक्रम देशात सुरू आहे. पण बजरंग बली व राम हा आपल्या सर्वांबरोबर आहेत. विकासाची भाषा बोलणाऱ्याला देशातील जनतेने कायम सहकार्य केलेले आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. जयंत पाटील पुढे म्हणाले की, विधानसभेत पराभव पत्करल्यानंतर देखील आपण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दैदीप्यमान यश प्राप्त केले. ज्या ठिकाणी भगिनींची साथ असते तिथे कधीच पराभव होत नाही. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जे यश मिळालेले आहे ते पुढच्या वेळी आपण अधिक वाढवू असा निर्धार त्यांनी केला.

सामान्य माणूस आज कोणत्या परिस्थितीत आहे? याचा बारकाईने अभ्यास करा. देशात आज फार मोठ्या प्रमाणामध्ये महागाई पसरलेली आहे, प्रचंड बेकारी वाढलेली आहे, गोरगरिबांचे प्रश्न दुर्लक्षित व्हायला लागलेले आहेत पण ज्याला महत्व अशाच गोष्टी आपल्यासमोर मांडल्या जातात. आज सामान्य माणसाचा आवाज दाबला जात आहे का? गोरगरिबांचे प्रश्न मांडण्याऐवजी वेगळ्याच गोष्टी समाजापुढे आणण्याचे काम चालू आहे का? हे प्रश्न सोडवता येत नाही म्हणून अपयश झाकण्यासाठी कोणतेतरी वेगळेच मुद्दे समोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे का? याचा शोध महाराष्ट्रातल्या जनतेने घेणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

भारतीय क्रिकेटच्या या स्टार्सना मिळाले राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण, जाणून घ्या कोण जाणार अयोध्येला?

जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेराची यशोगाथा सांगणार ‘बहिर्जी’ चित्रपट लवकरच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss