Sunday, April 28, 2024

Latest Posts

Rohit Pawar यांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, सागर बंगला हा कुटुंब फोडण्यासाठी…

आता आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. तसेच, सागर बंगला हा सर्वसामान्यांच्या अडचणींसाठी नाही, असेही ते म्हणाले.

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं चित्र दिसून येत आहे. याच मुद्यावरून काल दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी मनोज जरांगे-पाटील यांनी जोरदार निशाणा देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला आहे. सलाईनमधून विषप्रयोग करणे, एन्काउंटर करण्यासह इतर मार्गांनी मला संपविण्याचा डाव आखला जात आहे. असं जरांगे-पाटील म्हणाले आहेत. जरांगे यांनी उपचार घ्यावेत आणि नंतर मुंबईकडे जावे, यासाठी त्यांची मनधरणी करताना समाजबांधवांना मोठी कसरत करावी लागली होती. त्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत, जरांगेंची भाषा ही ठाकरे व पवारांची स्क्रीप्ट असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर, आता आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. तसेच, सागर बंगला हा सर्वसामान्यांच्या अडचणींसाठी नाही, असेही ते म्हणाले.

”फडणवीसांनी महाराष्ट्रातून एकता-समानता नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती अन् संस्कृती खराब करण्यास फडणवीसचं जबाबदार” आहेत, असे रोहित पवार यांनी यांनी म्हटले. तसेच, सागर बंगला नेत्यांना वाचवण्यासाठी आहे, सागर बंगला हा आमदारांना वाचवण्यासाठी आहे, सागर बंगला हा कुटुंब फोडण्यासाठी आहे. पण, गरिबांना ज्या अडचणी आहेत, त्यासाठी सागर बंगला काहीही मदत करत नाही, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंतरवाली सराटीमध्ये उपोषणासाठी बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा १६ वा दिवस आहे. आज त्यांनी आंतरवलीमध्ये निर्णयक सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी जरांगेंनी मराठा बांधवांशी संवाद साधला. मनोज जरांगे म्हणाले, मला सलाईनमधून विष देण्याचा डाव आहे. म्हणून मी सलाईन घेणं बंद केलं आहे. माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, असे म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान केले आहे.

हे ही वाचा:

Manoj Jarange Patil यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यांची प्रतिक्रिया म्हणाले…

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही; जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss