Saturday, July 27, 2024

Latest Posts

Sushma Andhar यांनी केला सवाल उपस्थित, मलिक अल्पसंख्यांक म्हणून..

सध्या राजकारणात अनेक घडामोडी या होत आहेत. तर आता या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.

काल दिनांक ७ डिसेंबर २०२३ पासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात ही झाली आहे. एकूण १० दिवस हे अधिवेशन चालणार आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. काल पासून सगळीकडे नवाब मलिक यांच्याच नावाची चर्चा ही चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर हजेरी लावल्यानंतर विधानसभेत आणि राज्यामध्ये सुद्धा अक्षरशः रणकंदन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाचा दिवस नवाब मलिक यांच्याभोवती फिरत राहिला. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यासंदर्भात गुरुवारी एक लेटरबॉम्ब टाकला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. या मुद्द्यावरून सध्या राजकारणात अनेक घडामोडी या होत आहेत. तर आता या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.

मलिक अल्पसंख्यांक असल्यामुळे ही भूमिका घेतली का असा सवाल सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपस्थित केलाय. हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली यामध्ये जनतेच्या प्रश्नावर चर्चा होईल अशी अपेक्षा होती, पण चर्चा मात्र वेगळ्याच विषयाकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिलीये. काल हा विषय काढण्यामागे राजकारण वेगळं आहे. आता पुढील तीन दिवस अधिवेशनात याच मुद्द्यावर चर्चा केली जाणार. कोट्यावधी रुपये खर्च करुन अधिवेशन पार पडत असतं. त्यामुळे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यावर चर्चा होण्याची गरज होती, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. नवाब मलिक अजित पवारांच्या दोन तीन गाठीभेटी झाल्या आहेत, त्यावेळी मालिकांनी पाठिंबा जाहीर केलाय. सत्तेत सहभागी झाल्यावर मालिकांचा जामीन झाला आहे, हे विशेष आहे असा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केलाय. मालिकांचा राजीनामा घेतला नाही असं आमच्यावर आरोप करणाऱ्या फडणवीसांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला का असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी केलाय. वाब मलिक अल्पसंख्याक आहे म्हणून काल हा विषय काढण्यात आला का असा घणाघाती प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केलाय.

 

मरसाळे, देवकाते अटक झाली. यातला एकही प्रमुख नाही. ठाकूरही शेवटची कडी नाही. कारागृहातून या गोष्टी चालतात. कारागृह निरिक्षक, महानिरीक्षक यांच्यावर काय कारवाई करणार हे सांगावे. तसेच ड्रग्सचं नेक्सस कधी बाहेर येणार आहे याबाबत देखील माहिती द्यावी, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली. अनिक्षा जयसिंघानि प्रकरणात अमृता फडवणीस यांची चौकशी लावणार का? असा सावल देखील यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय.

हे ही वाचा:

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस गाजण्याची शक्यता

पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवली, चार महिन्यात एवढ्या प्रमाणात उत्पादन घटले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss