राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगल्या गप्पा

गेल्या काही काळापासून राज ठाकरे आणि भाजपमधील जवळीक वाढत होती. मात्र नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरे यांनी भाजपवरही टीका केली होती.

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगल्या गप्पा

गेल्या काही काळापासून राज ठाकरे आणि भाजपमधील जवळीक वाढत होती. मात्र नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरे यांनी भाजपवरही टीका केली होती. ज्यांना वाटतं कोणीही आपला पराभव करु शकत नाही, त्यांनी या निकालातून धडा घ्यावा, असं राज ठाकरे म्हणाले होते. आता दोन्ही नेत्यांच्या भेटीवरुन अनेक अर्थ काढले जात आहेत. दरम्यान सव्वातासानंतर देवेंद्र फडणवीस हे आपला ताफ्यासह राज ठाकरे यांच्या निवासस्थानाहून रवाना झाले. त्यामुळे त्यांच्या नाकी कशासंदर्भात गप्पा रंगल्या हे पाहणे येणार कालच ठरवेल

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यामध्ये शिवतीर्थवर सोमवारी २९ मे डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस रात्री दहाच्या सुमारास राज ठाकरे यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये खूप वेळ चर्चा झाली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. राजकारणी यांच्या भेटीमुळे पेचात पडले आहेत. मात्र “अराजकीय गप्पा मारण्यासाठी काल शिवतीर्थवर गेलो होतो, “अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठे राजकीय नेते भेटले आणि राजकारणावर चर्चा झालीच नाही, यावर विश्वास ठेवणं थोडं कठीणच आहे.

राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस याना प्रसार माध्यमांकडून विचारणा केली असता, “अराजकीय गप्पा मारण्यासाठी काल शिवतीर्थवर गेलो होतो. बऱ्याच दिवसांपासून आमचं ठरलं होतं की एक दिवस गप्पा मारायला बसू आणि काल तो मुहूर्त निघाला. असं दिसावेंद्र फडणवीस यांच्या कडून सांगण्यात आले. असं ठरलंचं होतं की राजकीय सोडून गप्पा करायच्या. गप्पा या अराजकीय असतात,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


यावेळी राजकीय विश्लेषक रवीकिरण देशमुख यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं विश्लेषण केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मनसेला सोबत ठेवून एक चांगला पर्याय उपलब्ध करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहेत, असं देशमुख म्हणाले. “दोन राजकारणी भेटतात तेव्हा त्यांच्यात अनौपचारिक गप्पा होऊच शकत नाही, त्यांच्यातील आपसूकच राजकारणाच्या होतात. अलिकडे राज ठाकरे वेगळी भूमिका घेत आहेत. राजकारणात समान विरोधक असला तर दोन भिन्न विचारसरणीचे लोक देखील एकत्र येतात. त्यातच भाजप आणि मनसेची जवळीक वाढायला लागलीय अशा बातम्या येऊ लागल्या. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करु लागले. राज ठाकरे यांनी थोडी वेगळी ओळख दाखवत वेगळी विधानं केली. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मनसेला सोबत ठेवून एक चांगला पर्याय उपलब्ध करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहेत. त्याला छेद घेणारी भूमिका राज ठाकरे घेत आहेत असं दिसल्याबरोबर भाजप नेत्यांना असं वाटलं असावं की राज ठाकरे यांच्यासोबत संवाद वाढवणं गरजेचं आहे. कालच्या या भेटीकडे याच अर्थाने पाहिलं पाहिजे, असं रवीकिरण देशमुख म्हणाले.

Exit mobile version