spot_img
Thursday, February 22, 2024
spot_img

Latest Posts

नवनीत राणांविरोधात लोकसभेची जागा जिंकण्यासाठी ठाकरे गटाची रणनीती

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देण्याचा निश्चय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केल्याचे दिसते.

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देण्याचा निश्चय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केल्याचे दिसते. भाजपच्या सहयोगी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात ठाकरे गटाने त्यांच्या विरुद्ध उभा ठाकला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत प्रामुख्याने २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर महत्त्वाचे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ आणि अमरावती मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपूर्ण लक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही मतदारसंघातून लोकसभेवर आपला उमेदवार निवडून आणण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 

त्या अनुषंगाने आजच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांवर मोठी जबाबदारी देण्यात आल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळत आहे.तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातून माजी खासदार चंद्रकांत खैरे किंवा विधान परिषदेवरील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे विरुद्ध एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.दरम्यान, सुषमा अंधारेंना अमरावतीतून रिंगणात उतरवण्याच्या चर्चा होत्या. परंतु अमरावतीची जागा ही राखीव आहे आणि मी त्या प्रवर्गात बसत नसल्याने या चर्चा निरर्थक आहेत. माझ्यापर्यंत लोकसभा लढण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाल्याची माहिती नाही, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.महाविकास आघाडीत लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी निवड समिती स्थापन करण्यात आलीय. मात्र त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे नेते, लोकसभेच्या समसमान जागावाटपावर म्हणजे प्रत्येकी १६ मतदारसंघाचे जागावाटप होतील, या संदर्भात माध्यमांसमोर बोलत आहेत.

त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १८ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत लोकसभेच्या २० जागांसाठी तयारी सुरू केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय.छत्रपती संभाजी नगर आणि अमरावती लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गट उमेदवार उभा करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार MIM चे इम्तियाज जलिल आहेत. तर अमरावती लोकसभा मतदार संघात अपक्ष खासदार नवनीत राणा विद्यमान खासदार आहेत. या दोन लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गट आक्रमकपणे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेय. त्यामुळे आता पुढे समसमान जागा वाटपांवर काय चर्चा होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा : 

उद्धव ठाकरे हिंसाचाराच्या घटना घडवत आहेत, आमदार संजय शिरसाट

पी एमच्या खुर्चीवर नामोंची ९ वर्षे;सत्ता नसलेल्या राज्यात आता भाजपचा हैट्रिक प्लॅन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss