Saturday, July 27, 2024

Latest Posts

मंत्रिमंडळाची बैठक रद्द, रोखठोक भूमिका मांडणारा नेता हरवला- Dr. Shrikant Shinde

खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच ते चार वेळा आमदार असा त्यांचा अतिशय प्रेरणादायी प्रवास होता

आज मंत्रालयात होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार बाबर यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी सांगलीला जाणार आहेत.त्यामुळेच मंत्रालयात आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली आहे.

शिवसेना परिवारात मोठी पोकळी

सांगली येथील खानापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांचे आज आकस्मिक निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिवसेना परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा भावना कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केल्या. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच ते चार वेळा आमदार असा त्यांचा अतिशय प्रेरणादायी प्रवास होता. रोखठोक भूमिका मांडणे यासाठी अनिल बाबर कायम ओळखले जायचे. आज त्यांच्या जाण्याने खानापूर मतदारसंघासह राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण शिवसेना परिवार बाबर कुटुंबियांसोबत आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अशाप्रकारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सोशल मीडियाद्वारे व्यक्त झाले आहेत.

राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले

विधानसभा सभागृहातील माझे सहकारी आकस्मितपणे गेले. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आणि ‘पाणीदार आमदार’ अशी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो. अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ व्यक्त झाले आहेत.

एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व राज्याने गमावले

मतदारसंघाचे आमदार, शिवसेना नेते अनिल बाबर यांच्या अकाली निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या निधनाने समाजकार्याची जाण असलेले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व राज्याने गमावले आहे. असे कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

शेवटचा कार्यक्रम ठरावा ही माझ्यासाठी दुःखाची बाब

आपल्या मतदार संघातील शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम लढत राहिले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. दिनांक ७ जानेवारी २४ रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यास मी उपस्थित होतो. दुर्देवाने हा त्यांच्यासोबतचा शेवटचा कार्यक्रम ठरावा ही माझ्यासाठी दुःखाची बाब आहे. त्यांच्या निधनाने शिवसेना पक्षाचे एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझे मार्गदर्शक गमावल्याचे दुःख आहे. आम्ही सर्व बाबर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! भावपूर्ण श्रद्धांजली! अशा भावना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या.

हे ही वाचा:

Budget Session 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी PM Modi यांनी दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले

स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर,शेअर केला व्हिडिओ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss