Budget Session 2024, Narendra Modi on Opposition : गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी (Union Budget 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधाकांना टोला लगावला. त्याशिवाय अंतरिम अर्थसंकल्पाविषयी त्यांनी मत व्यक्त केले. नारीशक्तीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचेही ते म्हणाले.
तर आज बुधवार दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी बोलत असताना कोणाचेही नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदीम्हणाले – काही लोक सवयीने गोंधळ घालतात. असा गोंधळ करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. यावेळी भाषणाला सुरुवात करताना पंतप्रधान मोदी म्हणाले- २०२४ सालासाठी तुम्हा सर्वांना राम-राम! नवीन संसद भवनात झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या शेवटी एक फार मोठा निर्णय (महिला शक्ती कायदा) घेण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. उद्या (१ फेब्रुवारी, २०२४) अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील… ही महिला शक्ती आहे.
विरोधी पक्षनेत्यांच्या गोंगाटाच्या वृत्तीचा संदर्भ देत पंतप्रधान पुढे म्हणाले, “सर्व खासदारांना आठवणार नाही. टीका धारदार असू शकते पण गदारोळ होता कामा नये. गदारोळ करणाऱ्यांना कोणीही लक्षात ठेवत नाही. आता शेवटचा दिवस आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन.सर्वांना त्यांचे मत मांडण्याची संधी आहे.अशा परिस्थितीत त्यांनी प्रतिष्ठा राखली पाहिजे.काही लोक सवयीने गोंधळ घालतात.
हे ही वाचा:
अशोक सराफ यांचा जीवनप्रवास,आणि मजेशीर किस्से
Manipur violence : मणिपूर मध्ये हिंसाचाराचे सत्र सुरूच, गोळीबारात २ मृत्यू