Saturday, May 18, 2024

Latest Posts

काँग्रेसची कष्टकऱ्यांप्रतिची मानसिकता दिसून येते

चहावाला किंवा पानटपरीवाला हेही समाजातले सन्मानाने जगणारे घटक आहेत. पण कॅांग्रेसला त्यांच्या बद्दल आस्था नाही उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका करताना कॅांग्रेस यातून आपल्या मानसिकतेचं दर्शन घडवतेय अशी जोरदार टिका भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

चहावाला किंवा पानटपरीवाला हेही समाजातले सन्मानाने जगणारे घटक आहेत. पण कॅांग्रेसला त्यांच्या बद्दल आस्था नाही उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका करताना कॅांग्रेस यातून आपल्या मानसिकतेचं दर्शन घडवतेय अशी जोरदार टिका भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बेताल वक्तव्य करताना त्यांनी पान टपरीवाल्यासारखे भाषण केले असा उल्लेख केला. काँग्रेसकडून कधी चहावाल्यांची, कधी पान टपरीवाल्यांचे खिल्ली उडवली जाते तेही समाजाचे घटक आहेत, यातून काँग्रेसची सर्वसामान्य माणसाविषयीची आणि गरिबांच्या प्रति असलेली मानसिकता दिसून येते.

रोहित पवार यांना राजकीय कावीळ

आमदार रोहित पवार यांनी ट्विटर वरून केलेल्या टिकेला उत्तर देताना आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, ज्यांना कावीळ झाली आहे त्यांना सगळे जग पिवळ दिसतं. ज्या गोष्टींवर रोहित पवार आज बोलत आहेत त्या घटना महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडल्या आहेत. तेव्हा खुद्द मुख्यमंत्री मंत्रालयात येत नव्हते. अगदी ते मा. शरद पवारांनाही भेटत नव्हते. विकास कामे होत नसल्याने, निधी मिळत नसल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. एकंदरीत परिस्थिती पाहता रोहित पवार यांना राजकीय कावीळ झाली आहे.

संजय राऊत यांचा दुतोंडी भूमिका घेण्यात विश्वविक्रम

खा.संजय राऊत यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरे औरंगाबादचे नामांतर करण्यात अपयशी ठरल्याचे मान्य केले आहे. संजय राऊत यांचा दुतोंडी भूमिका घेण्यात विश्वविक्रम आहे. उस्मानाबादचे धाराशिव करण्याची पहिली मंजुरी केंद्र सरकारने दिली होती. औरंगाबादचेही लवकरच नामांतर होईल. सत्ता गेल्यामुळे संजय राऊत यांची फडफड सुरू आहे.

हे ही वाचा : 

सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली, पण न्यायालयाने निकाल ठेवला राखून

सरन्यायाधीशांचे मोठे विधान कपिल सिब्बल म्हणाले, कोणत्याही लोकशाहीला ते….

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss