Saturday, May 18, 2024

Latest Posts

पक्षप्रमुख पद बेकायदेशीर, शिंदे गटाच्या वकिलाचा मोठा दावा

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद बेकायदेशीर असून त्यांना पक्षप्रमुख पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा युक्तीवाद केला.

शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण नेमकं कोणाला मिळणार यावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. यावेळी कशा प्रकारे धनुष्यबाण आमचाच आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून करण्यात आला. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद बेकायदेशीर असून त्यांना पक्षप्रमुख पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा युक्तीवाद केला. यासाठी त्यांनी शिवसेनेची घटना देखील वाचून दाखवली. या घटनेसोबत त्यांनी काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले. त्यामधून शिंदे गट सरस असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला.

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिवसेनेची घटनावाचून दाखवत पक्षाची रचना काय हे निवडणूक आयोगात दाखवून दिले. शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती, पण बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात ती घटना न बदलता उद्धव ठाकरेंनी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख असे नाव लावले. पण त्यामुळे ते शिवसेना प्रमुख होत नाहीत, असा दावा जेठमलानी यांनी युक्तीवादात केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वःताकडे सगळे आदेश घेणारे जे बदल केले आहेत ते बोगस असल्याचं जेठमलानी यांनी म्हटलं. हे पटवून देताना जेठमलानी यांनी सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा दाखलाही दिला. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून निवड करण्यात आली होती, असा युक्तीवाद जेठमलानी यांनी केला.

त्यानंतर ठाकरे गटाचे वकील कबीर सिब्बल यांनी,”जोपर्यंत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे तोपर्यंत निवडणूक आयोगात सुनावणी नको,” अशी मागणी केली. या सुनावणीच्यावेळी ठाकरे गटाकडून संजय राऊत, अनिल देसाई आणि अनिल परब हे निवडणूक आयोगात उपस्थित होते. तर शिंदे गटाकडून कोणताही मोठा नेता यावेळी उपस्थित नव्हता. तसेच उद्धव ठाकरे यांचे पुतणे वकील निहार ठाकरे हे शिंदे गटाच्या वकिलांसोबत उपस्थित होते.

सुप्रीम कोर्टात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय देऊ नये, अशी ठाकरे गटाचे वकील कबीर सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केली. त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडून युक्तीवाद केला जाणार असेल तर तो युक्तीवाद हा प्राथमिक आहे की अंतिम आहे, हे स्पष्ट करण्यात यावं, अशी मागणी देखील कपिल सिब्बल यांनी केली.

त्यानंतर शिवसेनेतील ४० आमदार आणि १३ खासदार जरी शिंदे गटात गेले असले तरी त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं नाही, असं म्हणत, शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी,”आज सुप्रीम कोर्टात कोणालाही अपात्र ठरवण्यात आलेलं नाही. त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचं हे ठरवण्यासाठी कोणताही अडथळा नाही”, असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी केला. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील जेठमलानी यांनी केलीय.

निवडणूक आयोगाचा निर्णय प्राथमिक कि अंतिम असेल या विषयावरून सिब्बल आणि जेठमलानी यांच्यामध्ये झुंपलेली पाहायला मिळाले. यावेळी सिब्बल यांनी म्हटलं,”आमचा जर प्राथमिक युक्तीवाद फेटाळला तर आम्हाला तशी ऑर्डर आयोगाने करावी म्हणजे आम्हाला अपील करता येईल,असं सिब्बल यांनी म्हटलं. दरम्यान निवडणूक आयोगाने,”आम्ही एकत्र ऑर्डर करु”, असं स्पष्ट केलं.

तसेच शिंदे गटाकडे आमदार आणि खासदार यांचं बहुमत असल्यामुळे कायद्याच्या निकषानुसार शिंदे गटच योग्य आहे”, असा युक्तीवाद वकील महेश जेठमलानी यांनी केला.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे गटाकडून त्याच्या शाखाप्रमुखांपासून, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली, पण शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेले कागदपत्रे बनावट, असल्याचा दावा सिब्बल यांनी केला.

हे ही वाचा:

‘कुत्ते’, ‘लकड़बग्घा’ आणि हॉलिवूडच्या ‘प्लेन’सोबत ‘वारीसू’ची टक्कर, कोण गाजवणार बॉक्स ऑफिसवर वर्चस्व

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व वीज बिल माफीसह विविध ठराव एकमताने मंजूर, नाना पटोले

शर्मिला ठाकरेंनी केलं जेनेलियाचं भरभरून कौतुक, थेट केलं थिएटरचं बुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss