Tuesday, April 23, 2024

Latest Posts

गुप्त बैठका, फिरवलेले निर्णय, मराठा समाजाला त्यांनी जे काही गुमराह केलं; छगन भुजबळांची टीका

राज्यभरात मराठा आंदोलक (Maratha protestors) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.

राज्यभरात मराठा आंदोलक (Maratha protestors) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण हवे आहे, या मागणीवरून मनोज जरांगे ठाम आहेत. याच मुद्द्यावरून आता मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगेंनी काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने सागर बंगल्यावर जाण्यासाठी निघाले होते. मात्र पोलिसांनी लागू केलेल्या संचारबंदीमुळे त्यांना पुन्हा आंतरवली सराटीमध्ये जावे लागले.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलण्यास मला वेळ नाही. सध्या राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे मला तिकडे पाहू दे. सध्या मी दोन जुन्या नाटकांचा अभ्यास करत आहे. त्यांची जुळवाजुळव करत आहे. त्याचे नवीन स्क्रिप्ट तयार आहे.त्यामुळे मला या मुद्द्यावर बोलायला वेळ नाही, असे छगन भुजबळ म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया मांडली. त्यावेळी छगन भुजबळ म्हणाले, मनोज जरांगेंच पितळ उघडं पडलं जात आहे. त्यांनी गुप्त बैठका केल्या. त्यांनी फिरवलेले निर्णय, मराठा समाजाला त्यांनी जे काही गुमराह केलंय, त्यामुळे आता त्यांचेच लोक बोलायला लागलेले आहेत. कदाचित त्यामुळे त्यांचे ब्लड प्रेशर वाढले असेलआणि ते असे काही तरी बोलत आहेत. तुम्ही आधी तुमची तब्येत सांभाळा. मला एक आश्चर्य वाटत, उपोषण करत असूनदेखील त्यांचा आवाज फार खणखणीत आणि मोठा आहे. एवढी शक्ती उपोषणकर्त्याला कशी आली, हे वैद्यकीय क्षेत्रातील मोठे आश्चर्य आहे, असे म्हणत मनोज जरांगेंवर टीका केली आहे.

मनोज जरांगेंनी मराठा आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. आज आंतरवली सराटीमध्ये पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होणार आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाणार आहे त्यांनी मला आमंत्रण दिले आहे. मात्र आता संचारबंदी लागू केल्याने त्यांनी दारे बंद केली आहेत. त्यामुळे आमचा विजय झाला आहे, असे मनोज जरांगे म्हणले.

हे ही वाचा:

सरकारला आशा सेविकांची कदर नाही, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

संजय राऊतांचा जोरदार हल्लबोल, गृहमंत्रीपद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss