राज्यविधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ पासून मुंबई येथे सुरू झाले. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्च पर्यंत चालू राहणार आहे. या अधिवेशनात अनेक मुद्दे हे मांडले जाणार आहरेत. तर आज विरोधनकांनी आशा सेविका या मुद्द्याला चांगलेच हेरले होते.
मुंबईतील आझाद मैदानावर आशा सेविकांचे वेतनवाढीसह अन्य प्रलंबित मागण्यासांठी आंदोलन सुरू आहे. कुपोषित बालकांची सेवा करणाऱ्या आशा सेविकांची सरकारला कदर नाही, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Assembly Opposition Leader Vijay Wadettiwar) यांनी आज विधानसभेत केली. त्याचबरोबर सरकारने राज्यातील आशा सेविकांच्या मागण्या मान्य कराव्यात. त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी सरकारकडे केली. वाढीव वेतनासह अन्य मागण्यांबाबत जोपर्यंत शासन निर्णय जारी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची आशा सेविकांची भूमिका आहे. या आशा सेविकांना सरकारने न्याय दिला पाहिजे. अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडल्यानंतर आशा सेविकांच्या मागण्याबाबत सकारात्मक असल्याचे सरकारकडून स्षष्ट करण्यात आले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले. ‘फसवणूक नको आरक्षण द्या’, ‘महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने त्यांनी केली होती. याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर धिक्कार असो, मराठा समाजाच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा – ओबीसींची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत सरकार विरोधात निदर्शने केली.
हे ही वाचा:
Manoj Jarange Patil यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यांची प्रतिक्रिया म्हणाले…
सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही; जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम