Tuesday, April 23, 2024

Latest Posts

मला नाही अब्रू मी कशाला घाबरू, अशी भाजपची परिस्थिती;अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशावर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत.

काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, अशोक चव्हाण कालपर्यंत आमच्याशी जागा वाटपाबाबत बोलत होते. ते अचानक भाजपसोबत गेले, भाजप ४०० पार बोलले आणि घाबरले आहेत. त्यांचे ४० देखील खासदार निवडून येणार नाहीत. अर्थसंकल्पानंतर श्वेत पत्रिका काढली. त्यात आदर्श घोटाळा आणि संजय चव्हाण यांचे नाव आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या क्लिप आहेत. आदर्शमधील डीलर असा उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. मला नाही अब्रू मी कशाला घाबरू, अशी भाजपची परिस्थिती आहे, जे घाबरतात ते भाकड पक्षात जातात, अशी टीका ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

 उद्धव ठाकरे म्हणाले, सोनईमधल्या सोन्यासारखे माझे मर्द मावळे, काय वर्णन करू मी राज्यभर फिरतोय, ज्यांच्याकडे पक्ष चिन्ह नाही तरीही तुम्ही प्रेम करतात. मी नतमस्तक होतो. माझ्याकडे तुम्हाला द्यायला विश्वास आहे. गडाख आणि शिवसेना अशी जवळीक नव्हती. २०१९ मध्ये अपक्ष निवडून आले आणि आपल्याकडे आलेत मंत्रिपद दिले. आज तिकडे गेले असते तरी त्यांना मंत्रिपद दिले असते. पण गदाख यांनी निष्ठा ठेवली तुम्ही तिकडे गेले नाही.काल बातमी आली आज प्रवेश चालू झाला. अशोक चव्हाण कालपर्यंत आमच्याशी जागा वाटपाबाबत बोलत होते. ते अचानक भाजपसोबत गेले, जातील असे वाटले नव्हते. अर्थ संकल्पानंतर श्वेत पत्रिका काढली. त्यात आदर्श घोटाळा आणि संजय चव्हाण यांचे नाव आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या क्लिप आहेत. आदर्शमधील डीलर असा उल्लेख करण्यात आलेला आहे. ४०० पार बोलले आणि घाबरले. यांचे २०० नाही ४० देखील खासदार निवडून येणार नाहीत. माला नाही अब्रू मी कशाला घाबरू,असे भाजपचे आहे. जे घाबरतात ते भाकड पक्षात जातात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

शेतकऱ्यांकडून हमी पत्र लिहून घेत आहेत, हे शेतकऱ्यांना कळत नाही. समोरच्या जनतेत मला जगदंबा दिसत आहे. मोदींना वाटते नेते गेले पण पाळीव जनता त्यांच्या मागे जाईल मात्र असे होणार नाही, संकटाच्या छातीवर जाणारा महाराष्ट्र आहे. मोदींना शोभत नाही, तुम्ही देशाचे की, महाराष्ट्राचे पंतप्रधान आहेत. गुजराती बांधव आणि गुजरात विषयी मला काही बोलायचे नाही ते दुधात साखर विरघळून जाते तसे आपल्यात होते. मी त्यांना हुकूमशाह बोलतो. इथे शेतकऱ्यांना काही मिळत नाही, आणि गद्दारी करणाऱ्यांना खोके मिळतात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

हे ही वाचा: 

‘शिवा’ मालिकेनं केली प्रेक्षकांची नाराजी, ठरलेल्या वेळी मालिकाचं प्रसारण लांबवलं

भाजपमध्ये पक्षप्रवेशानंतर Ashok Chavan यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss