Sunday, May 19, 2024

Latest Posts

उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक सुरू

शिवसेनेतील आमदारांपाठोपाठ आता खासदारही बंड पुकारणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

मुंबई : शिवसेनेतील आमदारांपाठोपाठ आता खासदारही बंड पुकारणार असल्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या खासदारांन सोबत बैठक घेणार आहेत.

उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे आता खासदार उपस्थित राहण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना पक्षाबाबत नेमकी खासदारांची काय भूमिका आहे? त्यांची मागणी काय आहे? याविषयी प्रत्यक्ष उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत शिवसेना पक्ष येत्या 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा : 

शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांच्या गाडीचा अपघात

येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना खासदार आणि आमदार एनडीएक्या उमेदवार यांना पाठिंबा दर्शवणार आहेत. यावर मातोश्री वरील चालू असलेल्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.

शिंदे गटातील 16 बंडखोर आमदारांना उच्च न्यायालयाकडून दिलासा

शिवसेनेतून बंड करत बाहेर पडलेल्या 16 आमदारांना तात्पुरता सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयाशिवाय आमदारांवर कारवाई करू नये अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी विधानसभा अध्यक्षांना दिली आहे. सरन्यायाधीश यांच्या निर्णयामुळे तात्पुरता शिंदे गटातील बंडखोर आमदारांना दिलासा मिळाला.

‘मी पुन्हा येईन’! ‘प्लॅनेट मराठी’वर लवकरच…

Latest Posts

Don't Miss