Saturday, July 27, 2024

Latest Posts

VBA चा अजून तरी महाविकास आघाडीमध्ये समावेश झाला नाही- Prakash Ambedkar

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये समावेश झाल्यावर पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. लोकसभा जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये जागावाटप शेवटच्या टप्प्यात आहे. ४० जागांवर सर्व पक्षांचे एकमत झाले असून ८ जागांवर चर्चा सुरु आहे. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे या गटांसह वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष यांचा महाविकास आघाडीत समावेश आहे.

आम्ही आमचा इगो आड येऊ देणार नाही

३० जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीचं काही ठरलेलं नाही, असं लक्षात येत आहे. त्यांचा ठराव म्हणून माही आमचे काही मुद्दे समोर ठेवले आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षण, दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि किमान सामान कार्यक्रम अशा विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ३० जानेवारीला झालेल्या बैठकीत जागा वाटपावर काय ठरलं याची माहिती मागितली. तर २ तारखेची बैठक होईपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट करण्याचा आग्रह केला. आम्ही आमचा इगो आड येऊ देणार नाही. वंचित बहुजन आघाडीचा अजून तरी महाविकास आघाडीमध्ये समावेश झाला नाही. आम्हाला जे पत्र देण्यात आलं आहे, त्या पत्रावर काँग्रेसचे नाना पटोले यांची सही आहे पण बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची सही नाही. नाना पटोले हे काँग्रेसचे आहेत पण प्रतिनिधी नाहीत, त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक सहीला इतकं महत्त्व नसल्याचे यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

काय लिहिले होते पत्रात? 

दि. ३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे.

देशातील हुकूशाहीविरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल

याबाबत खासदार संजय राऊत यांनी सोशल मिडीयाच्याद्वारे वंचित बहुजन आघाडीचा आज महाविकास आघाडीत समावेश झाला. ॲड.बाळासाहेब आंबेडकर हे २ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील. वंचितमुळे देशातील हुकूशाहीविरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल. भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल. अशा आशयाची पोस्ट लिहित पत्रकाचा फोटो सोबत जोडला होता.

हे ही वाचा:

त्वचेची काळजी घेण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

आमदार अनिल बाबर यांचा ‘सरपंच ते आमदार’ की मिळवण्यापर्यंतचा प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss