Tuesday, May 14, 2024

Latest Posts

आम्ही आंबेडकरांचा सन्मान करतो, पण… Sanjay Raut यांचे सूचक वक्तव्य

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या दौऱ्याबद्दल माहिती दिली. शाहू महाराज यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने आम्ही कोल्हापूर मध्ये जाऊन महाराजांना भेटणार आहोत. तिथे सांगली येथे जाऊन वसंत दादा यांना श्रद्धांजली वाहू आणि नंतर मिरजमध्ये जाणार आहोत. अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. आमचे दौरे सुरू आहेत, आम्ही थांबणार नाही. वंचितने सोबत यावं, राजू शेट्टी यांनी सोबत यावं, अशी इच्छा आहे. याबाबत चर्चा पण झाली आहे. मोठे महाराज अपक्ष लढणार नाहीत, ते आदरणीय आहेत. म्हणून उद्धव ठाकरे भेट घेण्यासाठी जाणार आहेत, त्यांचे आशीर्वाद घेऊ. प्रकाश आंबेडकर यांचा कायम सन्मान करतो आणि आमच्यात लढण्याची हिंमत आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संविधान नष्ट करू पाहणाऱ्यांसोबत ते जाणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरेंबाबत मला माहिती नाही. राज ठाकरे एक उत्तम कलाकार आहेत, त्यांच्या मनातल्या संवेदना आणि खंत मला इतर कोणापेक्षा जास्त माहिती असतात. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे व्यंगचित्र त्यांनी मधल्या काळात काढल होतं, ते मला खूप आवडल होतं. राज ठाकरे यांनी पुलवामा येथील घटनेवर भाष्य केलं, त्यात त्यांनी पुलवामा हत्याकांड आधी राष्ट्रीय सल्लागार आणि पाकिस्तान सल्लागार यांच्यात गुप्त बैठक झाली आणि नंतर हल्ला झाला का? असा प्रश्न उपस्थितीत केला होता. तर मला असं वाटतं की, कालच्या भेटीनंतर अमित शाह यांनी त्यांना त्यांचं उत्तर दिलं असेल, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात कुठलाही वाद नाही. प्रत्येकाकडून लढण्याची इच्छा व्यक्त होत आहे. सर्वच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अनेकजण इच्छुक आहेत. दानवे यांच्याकडे सर्वात मोठे पद आहे आणि ते सरकारवर तुटून पडत असल्याचे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर UPSC परीक्षेच्या तारखेत बदल, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

एन्काउंटर प्रकरणातील Pradeep Sharma आहेत तरी कोण?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss