Monday, May 20, 2024

Latest Posts

शरद पवार अन् उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय घडलं? राऊतांच्या दाव्याने राजकीय चर्चेला उधाण

राज्यामध्ये रंगलेल्या सत्तानाट्याचा उत्तरार्ध सुरु झालेला आहे तसेच नव्या समीकरणांवरून तसे पहाटेच्या शपथविधीचे साक्षीदार असलेले अजित पवार (Ajit Pawar) अचानक यांचे नॉट रिचेबल आणि त्यांनतर त्यांनी अपचन झाल्याचे सांगितले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कौतुकाने भलतीच चर्चा रंगली आहे.

राज्यामध्ये रंगलेल्या सत्तानाट्याचा उत्तरार्ध सुरु झालेला आहे तसेच नव्या समीकरणांवरून तसे पहाटेच्या शपथविधीचे साक्षीदार असलेले अजित पवार (Ajit Pawar) अचानक यांचे नॉट रिचेबल आणि त्यांनतर त्यांनी अपचन झाल्याचे सांगितले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कौतुकाने भलतीच चर्चा रंगली आहे. भाजपच्या पक्षाला आता राष्ट्रवादी फोडण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचा दावा केला जात आहे. या सर्व चर्चांवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या दाव्यावरून पुन्हा एकदा राजकीय भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी सिझान-२ आल्याचा टोला लगावत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर नेमकी कोणती चर्चा झाली? यावरूनही ते बोलले आहेत.

संजय राऊत यांनी बऱ्याच वेळा सांगितले की एकनाथ शिंदे यांनाही तुरुंगामध्ये जायचे नव्हते म्हणून त्यांनी भाजपसोबत युती केली आणि ते सरळ बेईमानांचे सरदार झाले. मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो तेव्हा ते म्हणाले कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही परंतु कुटूंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न पण पक्ष म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडले.

ईडीच्या दहशतीने लोकांना फोडणे हे सभ्य लोकांचे राजकारण नाही. राजकारणामध्ये राहून लोकांनी अमाप संपत्ती कमावली आहे. ती टिकवण्यासाठी त्यांना सत्तेची कवचकुंडले हवी असतात. पवार यांनी एक चांगला मुद्दा मांडला आहे आज जे भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो तुम्ही भाजपमध्ये गेल्यामुळे टेबलावरची फाईल कपाटात जाईल पण या ईडी-सीबीआयच्या फायली कधीच बंद होत नाही. शिंदें बरोबर गेलेल्या ११ आमदार आणि ६ खासदारांच्या फायली सध्या टेबलावरून कपाटामध्ये गेल्या आहेत. शिंदे गटाप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अश्या किती फायली कपाटामध्ये जातील ते पाहायचे आहे. आज महाराष्ट्राचे चित्र काय आहे? शिंदे सरकारचे मंत्री मंत्रालयामध्ये जात नाहीत. देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरून काम करतात. शिंदेच्या ताब्यामध्ये तीन सरकारी बंगले आहेत. शिंदे यांचे चिरंजीव प्रशासनात सरळ हुल्लडबाजी करतात. मंत्रालयापासून सर्वत्र अस्वस्थता आहे. सरकार नक्की कोठे चालले आहे? ते मंत्रालयातच झोपले आहे.

हे ही वाचा : 

५६ वर्ष ज्या घराण्यामध्ये तुम्ही जन्माला आले ते घर टिकवू शकले नाही, नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Exclusive : भाजपाला पोहोचायचं राज्यातल्या ३ कोटी कुटुंबात

Armaan Malik ने दिली खुशखबर, दुसरी पत्नी Kritika Malik बनली आई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss