Tuesday, April 16, 2024

Latest Posts

वयस्कर लोकांना उपोषणात बसवल्यानंतर काही झालं तर काय करायचं? छगन भुजबळांचा सवाल

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहेत. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली. मात्र त्यांनी केलेल्या या मागणीवरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यांच्यात सुरु असलेल्या शाब्दिक वादामुळे सगळीकडे वातावरण तापले आहे. मनोज जरांगे हे मारुतीचं शेपूट आहेत. तो शांत बसणार नाही. गाडी ताब्यात घ्या. निवडणुका घेऊ नका असे तो म्हणतं आहे, असे म्हणत छगन भुजबळांनी जरांगेंवर हल्लाबोल केला आहे.

मनोज जरांगे यांना काहीही काळात नाही. विनाकारण गाव बंद करा म्हणतं आहेत. वयस्कर लोकांना उपोषणसाठी बसवत आहेत. त्यांना काही झालं तर काय करायचं? सर्व बाजूने सरकार सकारत्मक विचार करत आहेत, पण अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे सर्व चालू आहे. १० फेब्रुवारीला करण्यात आलेल्या उपोषणाबाबत कोणाला काही विचारण्यात आले नव्हते. श्रेय वादासाठी ते स्वतःहून उपोषणासाठी जाऊन बसले आहेत, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. सरसकट आरक्षण देता येणार नाही, सगेसोयरे हा शब्द कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही . कोर्टात याला विरोध होणार आहे. मराठा मतं जरांगे यांनी भडकवतील. ते आपली मते विरोधात जातील म्हणून सावध भुमिका घेतली जात आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

उपोषणाला बसलेल्या वयस्कर लोकांना काही झाले तर पोलिसांनी जरांगे यांना कारणीभूत धरावे. बारावी परीक्षा सुरू आहेत, हे रस्ते बंद करतात. त्यांना जनतेसाठी काही वाटत नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हे रस्त्यांवर उतरा सांगतात. जरांगे १० तारखेला उपोषणाला बसले होते, त्यावेळी कोणताही विचार समाजाला घेऊन जरांगे यांनी केला होता का? सगेसोयरे हा शब्द कायद्यात बसत नाही. एखाद्याचे वडील शेड्युल कास्ट असतील तर प्रमाणपत्र त्यांना मिळेल? असे छगन भुजबळ म्हणाले आहेत. अजय बावसकर यांची पहिली क्लिप वायरल होताना मी पहिली आहे. अजय बावसकर २००६ पासून मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी लढत आहेत. ते मनोज जरांगे यांच्या सोबत असायचे. त्यांच्यात अनेक गुप्त बैठका झाल्या आहेत, असे भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा: 

मुंबईत रंगणार ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा, CM Shinde यांची विशेष उपस्थिती

७० वर्षात कोणत्याही पंतप्रधानाने इतकी श्रीमंती भोगली नाही तेवढी मोदींकडे आहे; संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss