Friday, April 19, 2024

Latest Posts

राजकीय नेत्यांवर उघडपणे गोळीबार होतोय तिथे…Jitendra Awhad यांचा सवाल

मुंबईच्या महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Former corporator Abhishek Ghosalkar) यांची ८ फेब्रुवारीच्या रात्री हत्या करण्यात आली. या हत्यानंतर सगळीकडे वातावरण चांगलेच पेटले आहे. घोसाळकर यांची गोळी झाडून केलेल्या हत्येनंतर मुंबई पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर जुन्या रागातून मॉरिस नोरोन्हा (Morris Noronha) याने गोळी मारून हत्या केली, असा अंदाज वर्तवला जात आहे. यावर आता राजकीय वातावरणात रोष व्यक्त केला जात आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून जनतेच्या सुरक्षेची काय गॅरंटी असणार? असा सवाल उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात लागोपाठ उघडपणे गोळीबाराच्या घटना घडणं, ही अतिशय गंभीर बाब आहे. ‘सागर’ बंगल्यावर बसलेल्या गृहमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडतो. सरकार कुणाचंही असो पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल युपी/बिहारच्या दिशेने होणं ही इथल्या प्रत्येकासाठी शरमेची बाब असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. जिथे राजकीय नेत्यांवर उघडपणे गोळीबार होतोय तिथे जनतेच्या सुरक्षेची काय गॅरंटी असणार? असा सवाल सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यभरात गोळीबाराच्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत. याआधी आमदार गणपत गायकवाड महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. काल घडलेल्या अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया मांडली. अजित पवार म्हणाले, अतिशय चुकीची घटना घडली आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडू नयेत. दोघांचे संभाषण स्पष्ट झाले. त्यांचे मित्रत्वाचे संबंध चांगले दिसत आहे. या प्रकरणाचा नीट तपास झाला पाहिजे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. विरोधक सरकारची बदनामी करत असून, मी कोणाचे ही समर्थन करत नाही, असे अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा: 

मसाल्यांचा राजा म्हणून ‘या’ शहराची आहे ओळख

CM Eknath Shinde Not Out 60, प्रवास वाघाच्या डरकाळीचा आणि गरुडाच्या भरारीचा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss