Saturday, July 27, 2024

Latest Posts

बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण?, Sanjay Raut यांचा सवाल

मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल! गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत!

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले आहे. त्यासोबत त्यांनी एक फोटो सुद्धा अपलोड केला आहे. काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण? असा सवाल त्यांनी सोशल मीडियाद्वारे विचारला आहे. ४ फेब्रुवारी रोजी कल्याण मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस होता. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा फोटो खासदार संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे.

काय आहे संजय राऊत यांचे ट्विट?

मा. गृहमंत्री देवेंद्रजी जय महाराष्ट्र!

महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात!

गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण?

काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण? याचा शोध घ्या, मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल! गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत!

शरद मोहोळ यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेमंत दाभेकर यांनी ‘वर्षा’ या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा दिल्या. हेमंत दाभेकर हा गुंड किशोर मारणे खून प्रकरणाबाबत शरद मोहळ यांच्यासोबत होता आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हेमंत दाभेकर हा जामिनावर बाहेर आला असून, शरद मोहोळ यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहे. यामुळे, श्रीकांत शिंदे आणि दाभेकर यांचा एकत्र फोटो समोर आल्याने राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.

काय होते उल्हासनगर गोळीबार प्रकरण  

एकीकडे भाजप आणि शिवसेना एकत्र सरकारमध्ये आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच आमदाराने पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात चांगलची खळबळ उडाली. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणात भाजप आमदारा गणपत गायकवाड सह, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी १४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती वकीलांनी दिली. दरम्यान ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाडसह दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss