Thursday, March 28, 2024

Latest Posts

अरविंद केजरीवाल मुंबईमध्ये येऊन भेटणार कोणाला ???

काही दिवसांपासून राजधानी दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांच्या मुद्यावरून केंद्र विरुद्ध आप सरकार असा वाद पेटला आहे.

काही दिवसांपासून राजधानी दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांच्या मुद्यावरून केंद्र विरुद्ध आप सरकार असा वाद पेटला आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दाखल दिल्ली सरकरच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं नुकताच निकाल दिला. यामध्ये दिल्ली सरकारला दिलासा देत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार दिल्ली सरकारलाच असल्याचं म्हटलं जात आहे. सध्याच्या राजकारणात निवडणुकांचे वारे वाहत असताना अरविंद केजरीवाल यांनी मुंबई दौरा निश्चित कऱणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणूकीत भाजपविरोधात इतर विरोधी पक्ष एकवटताना दिसत आहेत. यादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीचा सपाटा लावला आहे. आज रविवारी दिल्लीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. यानंतर आता केजरीवाल हे लवकरच महाराष्ट्रात येणार आहेत. या भेटीदरम्यान ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २४ मे रोजी उद्धव ठाकरे आणि २५ मे रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार आहेत. दिल्लीतील सरकारी आधिकाऱ्यांच्या बदलीबाबत केंद्राच्या अध्यादेशा विरोधात पाठिंबा मिळावा यासाठी ही भेट घेणार असल्याचे वृत्त हाती आलेल्या माहितीच्या आधारे समोर आले आहे.

आता सुप्रीम कोर्टाचा हा आदेशच पलटवण्यासाठी केंद्र सरकारनं नवा अध्यादेश आणला आहे. दिल्लीमध्ये गट आधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई तसेच त्यांच्या बदल्यांसाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण निर्माण करण्यासाठी अध्यादेश आणला आहे. १९ मे २०२३ रोजी हा अध्यादेश आणण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी दुपारी ट्विट करत केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाचा आदेश पलटवण्यासाठी अध्यादेश आणण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला होता.याच अध्यादेशाविरोधात विरोधकांकडून पाठिंबा मिळावा यासाठी केजरीवाल महाराष्ट्रात येत आहेत. राज्यातील दोन प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

हे ही वाचा:

राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना देखील घेतले धारेवर

शरद पवारांनी सरकारवर सोडले खडेबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss