Monday, April 22, 2024

Latest Posts

उलटा निर्णय देणारे, यांना कोण निवडून आणणार; चंद्रकांत खैरेंची राहुल नार्वेकरांवर टीका

मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी लोकसभा निववडणुकीची सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) मुंबई दक्षिण मतदारसंघातून भाजप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) निवडणुकीत उतरवण्याच्या चर्चा सगळीकडे रंगल्या आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी राहुल नार्वेकरांवर जोरदार टीका केली आहे. उलटा निर्णय देणारे आणि ज्यांच्या फोटोला लोकांनी चपला मारल्या, त्यांना कोण निवडून देणार, असे म्हणत राहुल नार्वेकरांवर टीका केली आहे.

दरम्यान, यावर बोलताना म्हणाले, दक्षिण मुंबई हा मतदारसंघ शिंवसेनेचा बालेकिल्ला आहे. मागील अनेक वर्षांपासून शिवसेना तिथे निवडून आली आहे. पण जर ते म्हणत असतील इथून लोकसभा निवडणूक लढायची तर ज्या अध्यक्षांनी उलटा निर्णय दिला आहे. त्यांच्या बाबतीत लोकांचं मत खराब झाले आहे. पुतळे जाळले, चपला मारल्या, फोटो जाळले यानंतर त्यांना कोण निवडून देईल. आमचे अरविंद सावंत जबरदस्त काम करत आहे. हाडाचा कार्यकर्ता आहे, एकनिष्ठ आहे. त्यांची जबरदस्त तयारी त्या भागात आहे आणि तेच निवडून येतील. राहुल नार्वेकर लढले तरी पडतील. राहुल नार्वेकर यांचे स्वतःचे मत चुकीच्या निर्णयामुळे खराब झाले आहेत, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

काम कोण करत हे लोकांना माहित आहे, काम फक्त सच्चे शिवसैनिक करतात. म्हणून हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येथून ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणार आहेत. संपूर्ण जनतेला माहित आहे. शरद पवार यांचं चिन्ह काढून दुसरे चिन्ह दिलेले आहे. ज्यांनी यांना मोठे केले, ज्यांनी पक्ष मोठा केला, ज्यांनी पक्ष निर्माण केला त्याचे चिन्ह घड्याळ होते. ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले त्यांचाच पक्ष फोडला. लोकांना हे सर्व बघून शॉक बसला आहे. लोकांनी पूर्ण पाहून घेतलेले आहे. घड्याळीचे चिन्ह अध्यक्षांनी अजित पवार यांना दिलेले आहे. शरद पवारांना तुतारी दिलेली आहे. लोकांना माहित आहे शिवसेना कुणी फोडली, राष्ट्रवादी कुणी फोडली आणि आता काँग्रेस कोण फोडत आहे. त्यामुळे लोकांना सर्व गोष्टी माहित आहे आणि याचा परिणाम होणार नाही, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

हे ही वाचा:

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करणार; मनोज जरांगे आक्रमक

Priyanka Chopra ने दिली गुड न्युज, देसी गर्ल बनली…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss