spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

शांत न बसल्यास त्यांच्या पक्षासह त्यांच्या नेत्यांची नावे उघड करणार: मनोज जरांगेंचा थेट इशारा

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे लाखो मराठा बाधंवाना घेऊन मुंबईच्या दिशेने आले होते.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे लाखो मराठा बाधंवाना घेऊन मुंबईच्या दिशेने आले होते. मुंबईला आल्यानंतर मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या. मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर जरांगेंनी आंदोलन मागे घेतले होते. पण त्यानंतर सोशल मीडियावरील टीका पाहून मनोज जरांगे संतापले आहे. जरांगे यांची फसवणूक झाल्याची टीका सोशल मीडियावरून केली जात आहे. त्यांना आता मनोज जरांगे यांनी थेट इशारा दिला आहे. माझ्याविरोधात काहींनी सुपारी घेतली आहे, यापुढे शांत न बसल्यास त्यांच्या पक्षासह नेत्यांची नावे उघड करणार, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. तसेच १० फेब्रुवारीपासून कठोर आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे म्हणाले. आज आंतरवली सराटीमध्ये त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान आरक्षणावर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले, ७०- ७५ वर्षे मराठा समाजाला जे मिळालं नाही ते आंदोलनातून मिळणार आहे. हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. मराठा समाजाला विनंती आहे, माझ्यावर मुंबई आंदोलनाच्या अगोदर पण ट्रॅप रचला जात होता. मुंबईमध्ये रचण्यात आलेला ट्रॅप मला अगोदर समजला होता. राज्यात काही १०-२० जण आहेत, जे सरकारची सुपारी घेऊन बोलत असतात. पद आणि पैसे पाहिजे असतील, मात्र ते मिळाले नसल्याने विरोधात बोलत आहे. बहुतेक पक्षाच्या लोकांकडून यांना बोलायला लावले जात आहे. ज्यात बहुतेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोकं आहेत. यापुढे ते गप्प बसले नाही तर मी त्या लोकांच्या पक्षाची आणि त्यांच्या नेत्यांची नवे उघड करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मी तुम्ही रचलेल्या ट्रॅपला घाबरत नाही आणि मोजत देखील नाही. ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत ज्या ७५ वर्षांत कधीही मिळाल्या नव्हत्या. २००१ चा कायदा ओबीसी समाजाला आरक्षण देतो. आपण त्याला आव्हान दिल्यास सर्वच आरक्षण रद्द होते. ५४ लाख लोकांना प्रमाणपत्र जवळपास वाटप झाले आहेत. त्यामुळे नोंदी सापडलेल्या परिवाराने आता अर्ज करण्याची गरज आहे, असे जरांगे म्हणाले.

काही लोकं स्वतःला अभ्यासक आणि समाजाचे नेते समजतात. सर्व अभ्यासकांनी १० तारखेला आंतरवली सराटी मध्ये यावे. त्यांनी मराठा समाजात फूट पडू नये. मागासवर्ग आयोग स्थापन झाला हे आंदोलनाचे यश नाही का?, मुख्यमंत्री, सरकारने आरक्षणाची जबाबदारी घेतली आहे. आधी शरद पवार माझ्या पाठीमागे असल्याचे सांगण्यात आले, नंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पाठीमागे असल्याचे सांगितले गेले. दुही निर्माण करण्यासाठी ट्रॅप लावला जात आहे. ४० वर्षांपासून तुम्ही लढत असतांना काय मिळाले. सोशल मीडियावर लिहिणारे ट्रॅप मधलेच आहेत. अधिकारी घाबरायचे म्हणून खोलीत बोललो, बाहेर मला थंडी पण सहन होत नाही. पण आत बोलू की बाहेर बोलू आरक्षण मिळतेय ना?, असे मनोज जरांगे म्हणाले.

हे ही वाचा: 

संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लबोल, दादा बारामतीत सायकलवर फिरायचे…

‘ठरलं तर मग’ मालिकेत माथेरानमध्ये सायलीचा पार्टीत धिंगाणा,अर्जुन कसा सांभाळु शकेल ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss