Friday, April 19, 2024

Latest Posts

संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लबोल, दादा बारामतीत सायकलवर फिरायचे…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लबोल हा केला आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लबोल हा केला आहे.

यावेळी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, अजित पवार इतके निर्दयी होतील, असं मला वाटल नव्हतं… ज्या शरद पवारसाहेबांनी आपल्याला खाऊ पिऊ घातलं. आपल्याला वाढवलं. प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याच्याच बाबत तुम्ही अशी वक्तव्य करणं योग्य नाही. या नव्या कळपात गेल्यापासून आपण लांडग्यांच्या भूमिकेत गेलेला आहात. त्यांना मी वाघाची भूमिका म्हणणारच नाही. कारण वाघाला काळीज असतं. शरद पवारांशी आपले राजकीय मतभेद असू शकतात. पण तुम्ही आज जे काही आहात. तुम्ही जे सुखाचे चार घास खात आहात. ते पवारांमुळे…, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर शाब्दिक हल्ला केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. माझी शेवटची निवडणूक म्हणून काही लोक बारामतीकरांना आवाहन करतील. पण खरंच त्यांची शेवटची निवडणूक कधी होईल हे माहिती नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांवर महाविकास आघाडीतून टीका होत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

माझ्याकडे शिंदे गटाच्या खासदारांचा एक व्हिडिओ आला आहे. हे खासदार परदेशात कशासाठी जातात, हे सांगणारा हा व्हीडिओ आहे. तो व्हिडिओ लवकरच बाहेर येईल. शिंदे गँगचं चरित्र लवकरच समोर येईल. सगळं बाहेर येणार… Wait and Watch!, असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळ संजय राऊत आता कोणता व्हीडिओ समोर आणणार हे पाहणं महत्वाचं असेल. शरद पवारांनी एवढं मोठं सम्राज्य उभं केलं नसतं तर तुम्ही कुठे असता? अजित पवार तु्म्ही कोण आहात? बारामतीत तुम्ही सायकलवर फिरत होतात, हे आम्ही पाहिलेलं आहे. आज तुम्ही जे आहात ते शरद पवारांमुळे… पण माणसाने इतकं कृतघ्न असू नये, असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार, देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

Aaditya Thackeray PC Live : निवडणूक तोंडावर आल्यावर लोकार्पणाचे कार्यक्रम…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss