Tuesday, April 16, 2024

Latest Posts

मनसे भाजप युती होणार का? देवेंद्र फडणवीस आणि मनसे नेत्यांच्या बैठकीमुळे चर्चेला उधाण

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच आता मनसे भाजप युती होणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्यात गुप्त बैठक पार पडली आहे. मनसे नेते संदिप देशपांडे, बाळा नांदगांवकर, नितिन सरदेसाई या तीन नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीचे नेमकं कारण काय? मनसे भाजपमध्ये युती होणार का? भाजप आणि मनसे युतीचा प्रस्ताव हे या भेटी मागचं गुपित आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघं अनेकवेळा एकाच मंचावर आले आहेत. त्यामुळे भाजप आणि मनसे युतीवर अनेकदा चर्चा करण्यात आली आहे. भाजपच्या नेत्यांनी अनेकदा मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. अश्यातच आज मनसे नेते संदिप देशपांडे, बाळा नांदगांवकर आणि नितिन सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्यामुळे सगळीकडे भाजप मनसे युती होणार का अशा चर्चाना उधाण आले आहे. मनसे नेते संदिप देशपांडे यांनी देखील फडणवीसांसोबत बैठक झाल्याचे सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस आणि मनसेच्या तीन नेत्यांच्या भेटीमुळे अनेक चर्चाना उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संदीप देशपांडे म्हणाले, आमची विशेष काही चर्चा झालेली नाही. बऱ्याच दिवसांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे ती एक फक्त सदिच्छा भेट होती. तसेच पुढेही प्रसंग आल्यास अशा सदिच्छा भेट नक्कीच होतील. आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो, तर प्रत्येक वेळी त्याचा काहीतरी अर्थ काढला पाहिजे असे नाही. एकमेकांना भेटणं हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. देवेंद्र फडणवीस हे देखील राज ठाकरे यांना येऊन भेटतात. त्यामुळे आम्ही देखील त्यांना भेटलो, असे संदीप देशपांडे म्हणाले.

हे ही वाचा: 

ज्या बापाने पार्टी सुरु केली तो बापमाणूस आमच्या बरोबर आहे -रोहित पवार

पुण्यातील वाहुतक कोंडीमुळे नागरिक हैराण: विजय वडेट्टीवारांनी केला आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss