Saturday, July 27, 2024

Latest Posts

पुण्यातील वाहुतक कोंडीमुळे नागरिक हैराण: विजय वडेट्टीवारांनी केला आरोप

मागील काही दिवसांपासून पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न वाढतच चालला आहे.

मागील काही दिवसांपासून पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न वाढतच चालला आहे. या वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. पुणे मेट्रोचे ढिसाळ नियोजन यामुळे पुणेकर वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले आहेत. पुणे विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी संतापले आहेत. या सगळ्याला मेट्रो आणि पालिका प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे प्रशासनाला तात्काळ वठणीवर आणणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.असे न केल्यास दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे पेपर चुकण्याचा घटना पुन्हा घडतील. त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागे होऊन पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे.

दरम्यान, विजय वडेट्टीवार म्हणाले, सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कळीचा मुद्दा आहे. पुण्यात विकासाच्या बाता मारणाऱ्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. दहावी आणि बारावीचे विद्यार्थी परीक्षेला वेळेत पोहोचणार कसे? हा पुण्यातील पालकांच्यासमोर प्रश्न आहे. रिक्षा, ओला, उबेरने परीक्षेला जाणे सर्वांना परवडणारे नाही. शिवाजीनगर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठादरम्यान आचार्य आनंदऋषीजी चौकात तसेच पाषाण, औंध, बाणेरकडे जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे नियोजनबद्ध पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. महापालिका प्रशासन नागरिकांकडून कोट्यवधींचा कर वसूल करते, मग चांगले रस्ते, पायाभूत सुविधा उपलब्ध करून का देत नाही? असा प्रश्न पुणेकरांनी विचारला आहे.

जगभरात वाहतूक कोंडीसाठी पुण्याचा सातवा क्रमांक लागतो. टॉम टॉम या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. वाहतूक पोलीस यांची अपुरी संख्या, शून्य नियोजन यामुळे पुण्यातील प्रत्येक चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी वाढली आहे. पुण्यातील सत्ताधारी व्हिआयपींच्या गाड्यांसाठी वेगळा मार्ग आरक्षित केल्याने जनतेला त्याचा त्रास होत आहे. जनतेचा त्रास दिसत नाही ही वस्तुस्थिती असल्याचे, विजय वडेट्टीवार म्हणाले.

हे ही वाचा: 

जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, पवारसाहेब जिथे उभे राहतील तिथे पक्ष उभा राहील

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss