Saturday, July 27, 2024

Latest Posts

तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले- Jitendra Awhad

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या विधानावरून चर्चेत येत असतात. बारामती (Baramati) येथे दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून शरद पवार गटाकडून त्यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला. यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार यांनी ट्विट केले होते आणि आता त्याच ट्विटवर पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणे कितपत योग्य आहे? काकाच्या मृत्यूची वाट बघतोय, शरद पवार अजरामर राहतील. त्यांचे योगदान अजरामर राहील. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता? अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली आहे. भावनिक आवाहन तुम्ही करता, तर येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील. जितेंद्र आव्हाड यांच्या अशा टिकेनंतर अजित पवार यांनी ट्विट करत त्यांचे स्पष्टीकरण दिले.

काय म्हणाले अजित पवार?

काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

नाटकी लोकांना किमत देत नाही तर खुलासा कश्याला करता आहात. साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला, हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले जाऊ द्या. कधी तरी खरा चेहरा बाहेर येतोच, नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती आणि हो कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते.

हे ही वाचा:

PM Modi इकडच्या-तिकडच्या गोष्टींबद्दल बोलत असतात, मग मोजणीला का घाबरतात? – Rahul Gandhi

अजित पवार यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवावी, जितेंद्र आव्हाड यांचे खुले आव्हान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss