Tuesday, May 21, 2024

Latest Posts

PM Modi इकडच्या-तिकडच्या गोष्टींबद्दल बोलत असतात, मग मोजणीला का घाबरतात? – Rahul Gandhi

विरोधी पक्षांना तसेच काँग्रेस (Congress) वर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही बाबत भाजपची (BJP) असलेली भूमिका स्पष्ट केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेमध्ये भाषण करताना काँग्रेस (Congress) पक्षावर टीका केली. ओबीसींच्या (OBC) मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष करत स्वतः ओबीसी (OBC) असल्याचा उल्लेख केला ज्यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर दिले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान ५ फेब्रुवारी रोजी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाषण केले. यासोबतच विरोधी पक्षांना तसेच काँग्रेस (Congress) वर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही बाबत भाजपची (BJP) असलेली भूमिका स्पष्ट केली. तसेच विरोधकांच्या जात जनगणनेनुसार उपस्थित होणाऱ्या मुद्द्यावर निशाणा साधक पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ते स्वतः सुद्धा ओबीसी आहेत. या मुद्द्यावर आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून असे लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की देश फक्त दोन जातींमध्ये विभागलेला आहे, श्रीमंत आणि गरीब. पण असे असताना देखील आज संसदेत त्यांनी स्वतःला ‘सर्वात मोठा ओबीसी’ म्हटले आहे. कुणाला लहान तर कुणाला मोठे समजण्याची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. मग ते ओबीसी असो, दलित असो किंवा आदिवासी असो. त्यांची गणना केल्याशिवाय त्यांना आर्थिक (Economic) आणि सामाजिक (Social) न्याय मिळू शकत नाही जर नरेंद्र मोदी इकडच्या-तिकडच्या गोष्टींबद्दल इतके बोलत असतात, तर मग मोजणीला का घाबरतात? असा सवाल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.

काय आहे राहुल गांधी यांचे ट्वीट?

हे ही वाचा:

गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार, देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

Aaditya Thackeray PC Live : निवडणूक तोंडावर आल्यावर लोकार्पणाचे कार्यक्रम…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss