Sunday, May 19, 2024

Latest Posts

GT vs CSK, IPL 2023, आजपासून रंगणार आयपीएलचा रणसंग्राम, धोनी आणि हार्दिक आमने-सामने

जगातील सर्वात प्रतिष्ठित लीग IPL 2023 सुरू होण्यास आता अवघे काही तास शिल्लक आहेत. आज दिनांक ३१ मार्च रोजी आयपीएल २०२३ मधील पहिला सामना चेन्नई विरुद्ध गुजरात खेळवला जाणार आहे.

जगातील सर्वात प्रतिष्ठित लीग IPL 2023 सुरू होण्यास आता अवघे काही तास शिल्लक आहेत. आज दिनांक ३१ मार्च रोजी आयपीएल २०२३ मधील पहिला सामना चेन्नई विरुद्ध गुजरात खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे. आज आयपीएलच्या १६ व्या मोसमातील पहिला सामना आहे. आज मैदानात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. तर आजचा हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. अवघ्या काही वेळात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्या मधील मॅच ला सुरुवात होणार आहे.

आज चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामधील धमाकेदार सामना आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. आजच्या सामन्यात कोण बाजी मरण याकडे सर्वांचे लक्ष हे लागले आहे. एमएस धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे, गेल्या वर्षी गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले होते. आयपीएल २०२३ च्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघांचे अनेक खेळाडू उपलब्ध नसतील. या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

 गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळल्या जाणार्‍या सामन्यात दोन्ही संघांचे अनेक महत्त्वाचे खेळाडू उपलब्ध होणार नाहीत. हार्दिक पांड्याच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर त्याचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर उपलब्ध होणार नाही. तो सध्या नेदरलँड्सविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी राष्ट्रीय कर्तव्यावर आहे. गुजरातला पहिल्या सामन्यात डेव्हिड मिलरची उणीव भासू शकते. तसेच दुसरीकडे, जर आपण बघितले तर चेन्नई सुपर किंग्जबद्दल बोललो तर, पहिल्या सामन्यात त्यांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळेल याबद्दल शंका होती. वास्तविक, प्रशिक्षणादरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. धोनी सलामीच्या सामन्यात खेळणार असल्याचे सीएसकेच्या सीईओने स्पष्ट केले आहे.

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू –

गुजरात टायटन्सचे संभाव्य खेळाडू : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, राहुल तेवतिया, रशीद खान, शिवम मावी, जयंत यादव, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी.

चेन्नई सुपर किंग्ज संभाव्य खेळाडू : एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मिचेल सँटनर, दीपक चहर, तुषार देशपांडे

Latest Posts

Don't Miss