IPL २०२३, पुन्हा भिडले आरसीबीचे खेळाडू

कालचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals) या दोन संघांमध्ये पार पडला.

IPL २०२३, पुन्हा भिडले आरसीबीचे खेळाडू

कालचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals) या दोन संघांमध्ये पार पडला. या सामन्यांमध्ये शेवटच्या षटकामध्ये चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगरुळु संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) भांडण गौतम गंभीरसोबत (Gautam Gambhir) झालेले सर्वांनाच पहिले. कालच्या सामन्यातही आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फिल सॉल्ट (Phil Salt) यांच्यात लढत झाली होती. या सामन्यामध्ये दिल्लीच्या संघाने ७ गडी राखून पराभव केला.

आयपीएल २०२३ च्या ५० व्या सामन्यामध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ दिल्ली कॅपिटल्ससमोर होता. या सामन्यामध्ये आरसीबीने प्रथम फलंदाजी करून आरसीबीने ४ गाडी गमावून १८१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली संघाने अवघ्या १६.३ षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. आयपीएलच्या २०२३ च्या सीझनमध्ये आज मोहम्मद सिराज चांगली गोलंदाजी करत आहे. पॉवरप्लेमध्ये त्याच्याविरुद्ध धावा काढणे फलंदाजांसाठी खूप अवघड आहे. परंतु दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजने १० धावा दिल्या. यानंतर त्याने पाचवे षटक टाकले आणि त्या षटकात सॉल्टने ओव्हरच्या पहिल्या तीन चेंडूमध्ये २ षटकार आणि १ चौकार लगावला.

आरसीबीच्या संघाने प्रथम फलंदाजी करून धावसंख्या उभारली परंतु पहिल्याच षटकापासून त्यांच्या गोलंदाजांना दिल्लीच्या फलंदाजांनी चांगलेच धुतले. त्यामुळेच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला या गोष्टीचा राग आला आणि त्याने दिल्लीचा सलामीवीर फिल सॉल्टशी भिडला. यांनतर सिराजच्या बाऊन्सर टाकला परंतु तो चेंडू डोक्यावरून गेला आणि अंपायरने त्याला वाईड सांगितले. यानंतर सिराज फिल सॉल्टकडे गेला आणि काहीतरी म्हणाला. दोघांमध्ये वाद सुरू झाला. संतापलेल्या सिराजनेही बोट दाखवले. पंच आणि दुसऱ्या टोकाला असणाऱ्या फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने मध्यभागी येऊन बचाव केला.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version