Monday, May 20, 2024

Latest Posts

IPL 2023, मॅचआधी CSK चं Anthem Song लाँच, व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल

आज दिनांक ३१ मार्च रोजी आयपीएल २०२३ मधील पहिला सामना चेन्नई विरुद्ध गुजरात खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे.

आज दिनांक ३१ मार्च रोजी आयपीएल २०२३ मधील पहिला सामना चेन्नई विरुद्ध गुजरात खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे. आज आयपीएलच्या १६ व्या मोसमातील पहिला सामना आहे. आज मैदानात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. तर आजचा हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. अवघ्या काही वेळात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्या मधील मॅच ला सुरुवात होणार आहे. परंतु ही मॅच चालू होन्याक्सच्या आधी काही तास अगोदर चेन्नई सुपर किंग्सने (CSK) संघाचे अँथम साँग (CSK Anthem Song) लाँच केलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटर अकाउंट वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ‘व्हिसल पोडू’ असे चेन्नई संघाच्या या गाण्याचे बोल आहेत. चेन्नईने सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे माझ्या मॅच मध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष हे लागले आहे.

चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग 11 –

डेवोन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, शिवम दूबे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, दीपक चाहर, मुकेश चौधरी, महेश तीक्षणा

या सामन्याआधी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्याला बॉलीवूड गायक अरिजित सिंग (Arijit Singh), तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सारखे स्टार्स परफॉर्म करणार आहेत. उद्याच्या सोहळ्यामध्ये केवळ जमीनच नाही तर आकाशही उजळून निघणार आहे. फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे आणि सुंदर ड्रोन लाइट शोही आयोजित केला जाणार आहे. आयपीएलच्या सोहळ्याला ड्रोनमधून वेगवेगळी छायाचित्रे चमकताना दाखवण्यात येणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) सामन्याने हंगामाची सुरुवात होईल आणि या सामान्यपूर्वी विद्युत रोषणाई केली जाणार आहे. आयपीएलचा उघटन सोहळा तब्बल ५ वर्षानंतर होणार आहे. शेवटच्या वेळी आयपीएलचा उद्घाटन सोहळा झाला नाही. कारण २०१९ मध्ये पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे बीसीसीआयने उद्घाटन समारंभ न करण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएलच्या उद्घाटन समारंभात ड्रोनला जोडलेल्या लाईटसह आकाशात सुंदर सादरीकरण होणार आहे. यामध्ये आयपीएलचा लोगो बनवला जाणार आहे, ट्रॉफी आणि संघाचे लोगो प्रकाशित केले जाणार आहेत.

हे ही वाचा : 

IPL 2023, ३१ मार्च रोजी होणार आयपीएल उद्घाटन सोहळा

छ. संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss