Monday, May 20, 2024

Latest Posts

IPL 2023 : आज रंगणार दोन सामने! ‘हे’ संघ येणार आमने-सामने

काल दि ३१ मार्च रोजी टाटा आयपीएल ची (IPL 2023) दमदार सुरवात ही झाली आहे. काल हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने चेन्नईवर (Chennai Super Kings) ५ विकेट्सने विजय मिळवला.

काल दि ३१ मार्च रोजी टाटा आयपीएल ची (IPL 2023) दमदार सुरवात ही झाली आहे. काल हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने चेन्नईवर (Chennai Super Kings) ५ विकेट्सने विजय मिळवला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नईचा गुजरातकडून पराभव झाल्यानंतर कर्णधार महेंद्र सिंह धोनी निराश आहे. या सामन्याद्वारे चेन्नईच्या संघाला गुजरातविरुद्ध सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामाच्या सलामी सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) विजयी सुरुवात केली. परंतु आज क्रिकेट प्रेमींसाठी आयपीएल 2023 (IPL 2023) मधील पहिली डबल हेडर मॅच (IPL Double Header) म्हणजेच दोन सामने रंगणार आहेत.

आज एकाच दिवशी दोन सामने रंगणार आहेत. पहिला डबल हेडर सामना पंजाब (Punjab Kings) आणि कोलकाता (Kolkata Knight Riders) मध्ये होणार हे तर तर दुसरा डबल हेडर सामना दिल्ली (Delhi Capitals) आणि लखनौ (Lucknow Super Giants) यांच्यात होणार आहे. आज शानदार शनिवार ठरणार असून यंदाच्या आयपीएलमधील पहिली डबल हेडर मॅच होणार आहे.

Punjab Kings vs Kolkata Knight Riders –

आज दिनांक १ एप्रिल रोजी (शनिवारी) आयपीएल २०२३ मधील दुसरा सामना हा होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) या दोन संघामध्ये हा सामना होणार आहे. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर हा सामना रंगणार आहे. आज दुपारी ३. ३० वाजता हा सामना सुरु होणार आहे. आज या सामन्यात कोणती टीम बाजी मारणार हे पाहून नक्कीच महत्वाचं असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्सला त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यरची खूप उणीव भासणार आहे. अय्यरच्या अनुपस्थितीत केकेआरच्या विजयाची जबाबदारी पुन्हा एकदा आंद्रे रसेल आणि सुनील नरेन या कॅरेबियन जोडीवर असेल. येथे पंजाब किंग्जला जॉनी बेअरस्टोची सर्वाधिक उणीव भासणार आहे. हा स्फोटक फलंदाज दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर आहे आणि आयपीएल २०२३ मध्येही तो अनुपलब्ध आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये पंजाबचा समतोल चांगला असला तरी तो आजच्या सामन्यात फेव्हरिट दिसत आहे.

Lucknow Super Giants vs Delhi Capitals –

तर आयपीएल २०२३ मधील तिसरा सामना लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात होणार आहे. लखनौच्या मैदानावर होणार आहे. लखनौमधील इकाना स्टेडिअमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. २०१९, २०२० आणि २०२१ मध्ये दिल्लीने लागोपाठ प्लेऑफमध्ये दाखली झाली होती. तर, २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ उपविजेता होता. २०२२ मध्ये दिल्ली पाचव्या क्रमांकावर होता. दुसरीकडे लखनौ संघाने पदार्पणातच दमदार कामगिरी केली होती

लाईव्ह सामना कुठे पाहाल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग ‘Jio Cinema’ अॅपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

हे ही वाचा : 

IPL 2023, ३१ मार्च रोजी होणार आयपीएल उद्घाटन सोहळा

छ. संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss