Friday, April 19, 2024

Latest Posts

पत्नीच्या ‘त्या’ फोटोमुळे अचानक ट्रेंडमध्ये आला Irfan Pathan

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) अचानक सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये येऊ लागला, याचं कारण म्हणजे त्याने त्याच्या पत्नीचा फोटो शेअर केला आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इरफान पठाण यांनी पत्नी सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. इरफानने पत्नी सफा बैग (Safa Baig) सोबतचा फोटो शेअर करताना पहिल्यांदाच जगाला त्याच्या पत्नीचा चेहरा दाखवला. आतापर्यंत इरफान पठाणने त्याच्या पत्नीचा फोटो हा बुरख्यामध्ये असतानाच शेअर केला होता.

इरफान पठाण (Irfan Pathan) यांनी हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. काही लोकांना मात्र इरफानची ही कृती आवडली नाही. म्हणून, इरफानच्या फोटो खाली वाईट कमेंट सुद्धा करण्यात आल्या आहेत. काहींनी त्याला इस्लामचा हवाला देऊन फोटो डिलीट सुद्धा करायला सांगितला.

काय आहे इरफान पठाण (Irfan Pathan) यांची पोस्ट? 

अनंत भूमिका एका आत्म्याने साकारल्या आहेत – मूड बूस्टर, विनोदी कलाकार, समस्या निर्माण करणारी, नेहमी साथ देणारी, मैत्रीण आणि माझ्या मुलांची आई. या सुंदर प्रवासात मी तुला माझी पत्नी म्हणून जपतो. लग्नाच्या ८ व्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा!

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Irfan Pathan (@irfanpathan_official)

२०१६ मध्ये लग्न

इरफान पठाण याचे सफा बैग यांच्यासोबत २०१६ मध्ये लग्न झाले. हैद्राबादची असणारी सफा बैग (Safa Baig) हिने मॉडलिंगसुद्धा केले आहे. दोघांचं लग्न मक्का या ठिकाणी झाले होते. या जोडप्याला आता दोन मुलं आहेत. इरफान पठाण क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता टीव्ही मध्ये कॉमेंट्री करतो. सोशल मीडियावर त्याचे अनेक रील्स व्हायरल होत असतात.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss