Thursday, May 9, 2024

Latest Posts

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच गोरी नागोरीने केला खुलासा; म्हणाली…

बिग बॉस हा भारतातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये मोडणारा कार्यक्रम आहे . या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळत आहे. तसेच बिग बॉसच्या घरातील घडामोडी पाहणाऱ्या प्रेक्षांमध्येही वाढ होत आहे. आता ‘बिग बॉस मधील राजस्थानची गोरी नागोरी ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे . बाहेर पडताच गोरी नागोरीने महाराष्ट्राच्या शिव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच गोरी नागोरीने एक मुलाखत दिली होती. त्यात तिला शिव ठाकरे बद्दल तिचे मत मांडायला सांगितले होते. गौरीने मुलाखतीत सांगितलं की, शिव ठाकरे हा महिलांचा अनादर करणारा आणि अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करणारा खेळाडू आहे . तर अर्चना गौतमबद्दल काय वाटते ही विचारणा केली असता. गोरीने सांगितले की अर्चना आणि गोरीचे याआधी बिगबॉसच्या घरात वाद झाले होते त्यावेळेस अर्चनाने गोरीवर खूप शिवीगाळ केली होती. तरीही नंतर बिग बॉसच्या घरात अर्चना आणि शिव यांच्यात वाद झाल्यानंतर गोरी ही अर्चनाच्या बाजूने उभी राहिली कारण गोरिला शिवा ठाकरेच इतरांशी असलेला वागणं अजिबात आवडत नाही . गौरीचं म्हणणं आहे की शिव ठाकरे हा अर्चना गौतमच्या वैयक्तिक आयुष्यावर तिची थट्टा करत होता. अर्चनाने यावरून शिवला अगोदरच बजावले होते. तरीही शिव काही ऐकला नाही त्यावरून शिव आणि रचनांमध्ये भांडण झालं होत पण याच वादामुळे अर्चना गौतमला बिगबॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले .

गोरी ही राजस्थानमधील लोकप्रिय नृत्यांगना असून तिला हरियाणाचे शकिरा असे म्हटले जाते .गौरीने बिगबॉसच्या घरातून बाहेर पदातांना अभिनेता सलमान खान यांच्यासोबात डान्स देखील केला .तसेच मुलाखतीच्या शेवटी गौरीने तिच्या चाहत्यांसाठी एक संदेश दिला आहे काही काळ वाट पहा मग तुम्हाला गौरीचे धमाके पहहल्या मिळतील असा संदेश गौरीने तिच्या चाहत्यांना दिला आहे .

हे ही वाचा :

Happy Birthday Amey Wagh : अमेय वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त खास फोटो

प्रत्येक फुटीरांच्या गटात एक शिंदे कायम असतो हे लक्षात घ्या; संजय राऊत

टेक्सासमध्ये उंच आकाशात विमानांची धडक; विडिओ कॅमेऱ्यात कैद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss