मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद रोहित शर्माच्या हाती होते. पण यंदा मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद हार्दिक पांड्याकडे आहे. पण यंदाचे हार्दिक पांड्या याचे आयपीएल चांगलं गेले नाही असं दिसून येतंय. बऱ्याचवेळा तो ट्रॉल पण झाला. मुंबई इंडियन्सच्या फॅन्सने याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद हार्दिक पांड्याकडे दिल्याबद्दल रोहित शर्माचे फॅन्स त्याच्यावर टीका करत होते. गुजरात टायटन्सच्या समर्थक प्रेक्षकांनी अहमदाबाद स्टेडियममध्ये त्याच्या विरोधात नारेबाजी पण केली होती.
मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २४ मार्चला गुजरात टायटन्सबरोबर झाला होता. त्यामध्ये मुंबई इंडियन्सचा ६ धावांनी पराभव झाला होता. तर दुसरा सामना २७ मार्च सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध झाला होता. त्यामध्ये पण ३१ धावांनी हार पत्करावी लागली होती. मुंबई इंडियन्सचे चार सामने हे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. पाचवेळा आयपीएल विजेतेपद मिळवणारी मुंबई मागील सामन्यांचा अनुभव घेता पुढील सामने जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या विरुद्ध आता मुंबई इंडियन्सची सामने मुंबईमध्ये होणार आहेत.
सनरायजर्स हैदराबादच्या सामान्यनंतर सर्व खेळाडू दिल्ली येथे परतले होते. लगेचच, हार्दिक पांड्या मुंबईतील घरी निघून गेला आहे. सलग दोन मॅचमध्ये झालेला पराभव या सगळ्यामुळे त्याच्या जीवाला लागला आहे. हार्दिक पांड्याने हैद्राबादच्या मॅचनंतर ब्रेक घेतला आहे. मुंबईची १ एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. या काळात हार्दिक पांड्या घरी गेला असून काहीवेळ कुटुंबीयांसोबत घालवणार आहे.
हे ही वाचा:
शेपटीला चिंधी लावून महायुतीत व्यत्यय आणू नये, संजय शिरसाटांनी केली गिरीश महाजनांवर टीका
Follow Us