Wednesday, February 28, 2024

Latest Posts

Rohit Sharma ला कर्णधारपदावरून हटवल्यामुळे MI ला मोठे नुकसान तर CSK ला झाला फायदा, इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स…

आयपीएल 2024 (IPL 2024) च्या लिलावाआधीच मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या चाहत्यांना धक्का दिलाय. मुंबईने काल दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार म्हणून नियुक्त केले.

आयपीएल 2024 (IPL 2024) च्या लिलावाआधीच मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या चाहत्यांना धक्का दिलाय. मुंबईने काल दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार म्हणून नियुक्त केले. पाच वेळच्या आयपीएल विजेत्या रोहित शर्माकडून (Rohit sharma) कर्णधारपद काढून घेतले. हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. तसेच मुंबई इंडियन्स च्या या निर्णयामुळे एकीकडे संघाला नुकसान तर बघायला मिळत आहे तर दुसरीकडे याचाच फायदा चेन्नईला होताना दिसत आहे.

मुंबई आणि चेन्नई हे दोन IPL मधील सर्वात यशस्वी संघ आहेत. या दोन्ही संघांनी ५ – ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे आणि अनेक वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरले आहे. या कारणास्तव, या दोन आघा डीच्या संघांमधील परस्पर वैरही जबरदस्त आहे. मुंबई आणि चेन्नई संघांमध्ये मैदानावर तसेच मैदानाबाहेर म्हणजेच सोशल मीडियावर बरीच टक्कर पाहायला मिळत आहे. या दोन मोठ्या आयपीएल संघांच्या चाहत्यांमध्ये सतत भांडणे होत असतात, ज्याचा परिणाम या दोन संघांच्या सोशल मीडिया हँडलवरील फॉलोअर्सच्या वाढत्या आणि कमी होणाऱ्या संख्येवर होतो. १५ डिसेंबर रोजी मुंबई इंडियन्स संघाने अशी घोषणा केली, त्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया चाहत्यांनी त्यांची साथ सोडण्यास सुरुवात केली. मुंबईने गेली १० वर्षे कर्णधार असलेल्या रोहित शर्माला हटवून ५ वेळा चॅम्पियन, कर्णधार बनवले आणि हार्दिक पांड्याला नवा कर्णधार बनवले.

मुंबई इंडियन्सच्या या हालचालीचा परिणाम सोशल मीडियावर दिसून आला आणि काही तासांतच त्यांचे लाखो फॉलोअर्स गमावले. याचा फायदा चेन्नई सुपर किंग्जला झाला. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जच्या फॉलोअर्सची संख्या आधीच खूप जास्त होती, पण मुंबईच्या या मोठ्या पाऊलानंतर चेन्नई सुपर किंग्जचा संघ इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला आयपीएल संघ बनला आहे. इंस्टाग्रामवर चेन्नई सुपर किंग्जच्या फॉलोअर्सची संख्या आता सर्वाधिक १३ दशलक्षाहून अधिक झाली आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्सच्या फॉलोअर्सची संख्या १२.९ दशलक्ष इतकी कमी झाली आहे.

खरं तर, रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर मुंबई इंडियन्सचे फॉलोअर्स रातोरात कमी झाले आणि चेन्नई सुपर किंग्जच्या फॉलोअर्सची संख्या पूर्वीपेक्षा वाढली. यामुळे चेन्नईचा संघ आता इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला आयपीएल संघ बनला आहे. आता मुंबई इंडियन्सच्या नव्या कर्णधारासह चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना कसा रंगतो आणि त्यात कोण बाजी मारतो हे पाहावे लागेल.

हे ही वाचा:

Hardik Pandya ला कर्णधार बनवल्यानंतर चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर?, दीड लाख फॉलोअर्स झाले कमी…

‘फायटर’ चित्रपटातलं पहिलं गाणं प्रदर्शित

अपात्र आमदार निकालासाठी राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss