Monday, May 20, 2024

Latest Posts

कसोटीपूर्वी ‘हा’ भारतीय गोलंदाज होणार क्रिकेटमधून मुक्त

भारत आणि इंग्लड यांच्यामध्ये येत्या ७ तारखेपासून पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

भारत आणि इंग्लड यांच्यामध्ये येत्या ७ तारखेपासून पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. धर्मशालामध्ये कसोटी सामना सुरु होण्याच्या आधी भारताच्या फिरकी गोलंदाजाने निवृत्तीची घोषणा केल्याची माहिती समोर येत आहे. डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज शहाबाज नदीम याने मंगळवार दिनांक ५ मार्च रोजी निवृत्तीची घोषणा केली. त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली.

शहाबाज नदीम याने भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले आहेत, परंतु त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही. शहाबाज नदीम क्रिकेट क्षेत्रात झारखंड संघाचे प्रतिनिधित्व करत होता. त्याने रणजी २०२२ ते २०२३ च्या स्पर्धेत राजस्थानविरोधात शेवटचा फर्स्ट क्लास सामना खेळला होता. त्यानंतर त्याने निवृत्तीही घोषणा केली. शहाबाज नदीम यांच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ५४२ विकेटची नोंद झालेली आहे. शहाबाज नदीम जगभरात होणाऱ्या अनेक टी २० लीग स्पर्धेत खेळला आहे.

हे ही वाचा:

पुणे मेट्रो २ चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन

वांद्रे ते कुर्ला व्हाया बीकेसी धावणार पॉड टॅक्सी – CM Eknath Shinde

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss