Friday, May 3, 2024

Latest Posts

कर्नाटकातील धक्कादायक घटना: ‘ते दोघे’, ‘खून’ आणि ‘धर्म’

सध्याच्या निवडणुकीच्या काळात निवडणुकीबरोबर आणखीन बरंच काही देशात चालू आहे. नुकतीच समोर आलेली घटना म्हणजे कर्नाटक मधील हुबळी मध्ये एका महाविद्यालयीन मुलीचा खून झाला आहे.

सध्याच्या निवडणुकीच्या काळात निवडणुकीबरोबर आणखीन बरंच काही देशात चालू आहे. नुकतीच समोर आलेली घटना म्हणजे कर्नाटकमधील हुबळीमध्ये एका महाविद्यालयीन मुलीचा खून झाला. ही मुलगी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी होती. तिचे नाव नेहा हिरेमठ असून महाविद्यालयीन शिक्षण ती घेत होती. नेहाच्या आयुष्यात नंतर जे काही झालं ते हादरवून टाकणार होत. २३ वर्षीय नेहा ही हुबळी मधील बीव्हीबी महाविद्यालयात एमसीएचे शिक्षण घेत होती. तिच्याच महाविद्यालयात फयाज देखील शिक्षण घेत होता. ‘फयाजचे नेहावर प्रेम होते. नेहाचा तो पाठलाग देखील करायचा. नेहाच्या वडिलांनी त्याला कित्येकदा बजावले देखील होते. परंतु त्याने तिचा पाठलाग सोडला नाही. नेहाला अश्या गोष्टी आवडायच्या नाही. तिला तो आवडत नव्हता. तिने त्याला नकारही दिला होता. शिवाय आपण वेगळ्या समाजातून येत असल्याचे देखील त्याला सांगितले होते. तरीही त्याने नेहाचा जीव घेतला’. असे नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांनी सांगितले.

हत्या झाल्यानंतर काहीच तासात पोलिसांनी निरंजनला ताब्यात घेतले. मात्र या हत्येनंतर हुबळीमधील राजकारण तापले आहे. भाजपने या मुद्द्यावर काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने १८ एप्रिलपासून तीव्र निषेध आंदोलन छेडले आहे. तसेच हा लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप ही केला आहे. झालेल्या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणात रहिवासी रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहेत.

दुसरीकडे बेंगळुरूमध्ये रुक्साना नावाच्या २१ वर्षीय तरुणीला मारून जाळण्यात आलं. रुक्साना आणि प्रदीप हे दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. प्रदीप ३१ वर्षीय असून तो अगोदरच विवाहित होता. हे रुक्सानाला माहित नव्हतं. रुक्साना ला १ महिन्याचं प्रदीपकडून बाळ झाल्यानंतर तिने प्रदीपकडे लग्नाचा तगादा आळवला. नंतर प्रदीपने तिची जाळून हत्या केली व तिचे १ महिन्याचे बाळ फेकून दिले. नेहाच्या मृत्यूचा व्हिडीओ सर्वत्र वायरल होत आहे. लोक न्यायाची मागणी करत आहेत. दुरीकडे रुक्सानासोबत जे काही झालं त्याबद्दल अधिक लोकांना ज्ञात नाही. झालेल्या प्रकारानंतर दोन्ही धर्माचे लोक पेटून उठले आहेत. तरी सतत होणाऱ्या अश्या प्रकरणांवर सरकार काय निर्णय घेईल याकडे सर्वांचं लक्ष आहे.

हे ही वाचा:

मतदार यादीत नाव आहे की नाही? तपासणार कसे?

सत्ताधाऱ्यांच्या हातात पुन्हा सत्ता गेली तर सत्तेचा गैरवापर करतील, Sharad Pawar यांचा BJP वर निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss