Wednesday, February 28, 2024

Latest Posts

सर्वसामान्य जनतेला मोठा फटका, CNG च्या दरात वाढ

महागाईच्या दरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

महागाईच्या दरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यातच कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होत नसल्यामुळे सर्वसामन्य जनतेला त्याचा मोठा फटका बसला आहे. अश्यातच आता सीएनजीच्या दरातही (CNG Price) वाढ होत आहे. दिल्ली एनसीआरमध्ये तीन आठवड्यात दुसऱ्यांदा ही वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात १ रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत सीएनजीची किंमत ७६.५९ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तीन आठवड्यात दुसऱ्यांदा ही वाढ झाली आहे. यापूर्वी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात CNG च्या दरात वाढ करण्यात आली होती. सीएनजीच्या किंमती किती वाढल्या आहेत याबाबत सविस्तर माहिती पाहुयात. दिल्लीत सीएनजीची किंमत पेट्रोलच्या तुलनेत २० रुपयांनी कमी आहे. नवीन किंमती आज म्हणजेच १४ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून लागू झाल्या आहेत. दिल्ली एनसीआरमध्ये सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली आहे.

देशाची राजधानी दिल्लीत सीएनजीच्या दरात तीन आठवड्यांत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात किलोमागे एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत सीएनजीची किंमत ७६.५९ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सीएनजीच्या दरात शेवटची घसरण जुलै महिन्यात झाली होती. ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात सीएनजीच्या दरात वाढ झाली होती. यापूर्वी ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्ली आणि एनसीआर भागातही सीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या, तर रेवाडीमध्ये किंमती कमी करण्यात आल्या होत्या. त्याआधी ऑगस्ट महिन्यातही सीएनजीच्या दरात वाढ झाली होती. IGL ने ऑगस्टमध्ये वर्षभरात किमतीत दुसरी वाढ केली होती.

हे ही वाचा:

Christmas साठी केक बनवताय? त्याच सिक्रेट माहितेय? जाणून घ्या केक मिक्सिंगविषयी…

खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित ,  काय आहे कारण ? 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss