Saturday, July 27, 2024

Latest Posts

परदेशात फिरायला गेल्यानंतर ‘या’ पद्धतीने करा तुमचा UPI अ‍ॅक्टिव्हेट

भारतासह परदेशात सगळीकडे मोबाईल बँकिंग (Mobile banking) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भारतासह परदेशात सगळीकडे मोबाईल बँकिंग (Mobile banking) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यूपीआयचा (UPI) वापर करून सहज पेमेंट करता येते. त्यामुळे सगळी काम अगदी सहज करता येतात. पण ज्या वेळेस आपण भारताच्या बाहेर फिरण्यासाठी जातो तेव्हा यूपीआय पेमेंटचा वापर कसा करायचा हे अनेकांना माहित नसतं. अनेकदा परदेशात गेल्यानंतर यूपीआयचा वापर करून पेमेंट करताना अनेक समस्या उध्दभवतात. पण आता ही समस्या UPI ने सोडवली आहे. आता भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्येसुद्धा यूपीआय पेमेंटचा वापर करता येणार आहे. श्रीलंका, मॉरिशस, भूतान, ओमान, नेपाळ, फ्रान्स इत्यादी देशांमध्ये तुम्ही UPI पेमेंटचा वापर करू शकता. तुम्ही देखील परदेशात जाऊन तुमचे UPI अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. तुमचा UPI तुम्ही कसा अ‍ॅक्टिव्हेट करू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुमचा UPI पेमेंट कसे अ‍ॅक्टिव्हेट कराल?

सगळ्यात आधी तुमच्या फोनमध्ये UPI ॲप ओपन करा आणि तुमच्या प्रोफाईल वर क्लिक करा. त्यानंतर पेमेंट सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर UPI इंटरनॅशनल सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय UPI पेमेंटसाठी वापरत असलेल्या बँक खात्याच्या पुढील Active बटणावर क्लिक करा. नंतर तुमचा UPI पिन टाका.

परदेशात Google Pay कसा अ‍ॅक्टिव्हेट कराल?

सगळ्यात आधी Google Pay ॲप ओपन करा त्यानंतर स्कॅन QR कोड वर क्लिक करा. क्लिक करून झाल्यानंतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्याचा QR कोड स्कॅन करा. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार रक्कम टाका. रक्कम टाकून झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचे असलेले बँक अकाऊंट ओपन करा. त्यानंतर तुम्हाला ‘UPI इंटरनॅशनल’ अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी एक स्क्रीन दिसेल. तिथे तुमचे UPI इंटरनॅशनल अ‍ॅक्टिव्हेट करा.

हे ही वाचा:

मनोज जरांगे यांचे पुन्हा एकदा आंदोलन, राज्यातील प्रत्येक गावात आज रास्ता रोको आंदोलन

Sharad Pawar : रायगडावरून ‘तुतारी’ चिन्हाचं अनावरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss