मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेसह लाखो मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. २० फेब्रुवारीला आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य विधिमंडळाने एकदिवसीय अधिवेशन बोलावले होते. या अधिवेशात आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यात आला आहे. असा दावा सगळीकडे केले जात आहे. मात्र, आरक्षण देण्यात आलेलं असूनसुद्धा मनोज जरांगे अजूनही समाधानी नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. आज सकाळपासून सर्व गावोगावी रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन सकाळी १०.३० वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, जनतेला त्रास होईल असं आंदोलन कुणीही करू नये, असे फडणवीस म्हणाले. आजपासून सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आज राज्यभरात सगळीकडे एक दिवस रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. राज्यात सगळीकडे बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू असल्याने आंदोलनाची वेळ बदलून ११ ते १ करण्यात येणार आली आहे. तसेच २५ फेब्रुवारीपासून राज्यभरात गावागावात ग्रामपंचायत किंवा मंदिरासमोर धरणे आंदोलन करण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. या आंदोलनादरम्यान, दरदरोज सगयासोयऱ्याच्या मागण्यांचे निवेदन शासनाच्या प्रतिनिधीला दिले जाणार आहे.हे निवेदन स्वीकारण्यासाठी शासनाचा अधिकारी सकाळी १० वाजताच्या आतमध्ये गावात आला पाहिजे, नाहीतर रास्ता रोको आंदोलन केले जाईल.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आतपर्यंत आमरण उपोषणाचा मार्ग वापरला आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी राजकीय पुढाऱ्यांना आणि नेत्यांना गावात येण्यास बंदी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांचे हे आंतरवली सराटी गावात चौथे आंदोलन आहे. त्यांनी पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन पुकारल्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. बीड, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, सोलापूर, लातूर, नाशिक, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यात एकदिवसीय आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा कोहिनूर हरपला; सर्वपक्षीय नेत्यांकडून Manohar Joshi यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
गौरी खानचं नव्या क्षेत्रात पदार्पण,सुरु केलं मुंबईत स्वतःचं पहिलं रेस्टॉरंट