Monday, May 20, 2024

Latest Posts

सोन्याच्या दरात एवढ्या रुपयांनी वाढ, सोन्याला किती दर?

सध्या जगभरात सोनं (Gold) खरेदीला ग्राहकांचा खूप कमी प्रतिसाद मिळत आहे.

सध्या जगभरात सोनं (Gold) खरेदीला ग्राहकांचा खूप कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी पाठ फिरवली आहे. अमेरिकेतील फेडरल बँकांनी व्यदरात केलेल्या कपातीमुळे गुंतवणूकदरांनी आपली गुंतवणूक ही सोन्यात करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोन्याचा दर २ हजार रुपयांनी वाढला आहे. गेल्या ४८ तासात १० ग्रॅम सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी(GST) सह ६६,१०० रुपयांवर जाऊन पोहचले आहेत.

जागतिक पातळीवरील अमेरिकन बँकांनी आपल्या व्याज दरात मोठी कपात केल्याने अनेक गुंतवणूक दरांनी सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार सोनं खरेदीकडे वळले आहेत. सोन्याच्या दरात तब्बल २ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. दोन दिवसांत सोन्याच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली आहे. तसेच येणाऱ्या पुढील काळात सोन्याच्या दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.

सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली आहे. घरामध्ये लग्न कार्य असल्याने सोनं खरेदी करावं लागत. मात्र आता वाढत्या किमतींमुळे अनेकांचे बजेट कोलमडले आहे. सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांनी खेद व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

“इंद्रायणी” मालिकेतून येणार अवखळ इंदू प्रेक्षकांच्या भेटीला,मालिकेच्या शीर्षकगीताला रसिकांची प्रचंड दाद

ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार – CM Eknath Shinde

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss