Saturday, July 27, 2024

Latest Posts

अरविंद केजरीवाल यांच्या घरी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून चौकशी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांना कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी (Delhi New Excise Policy) केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने पाचव्यांदा समन्स बजावला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांना कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी (Delhi New Excise Policy) केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने पाचव्यांदा समन्स बजावला आहे. त्यांना याआधी ईडीकडून चार समन्स बजावण्यात आले होते. पण तरीसुद्धा ते चौकशीसाठी हजर राहिले नाही. यामागे काही राजकीय षडयंत्र आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. त्यानंतर त्यांना पाचव्यांदा समन्स बजावण्यात आला आहे. त्यांना २ फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी दिल्ली क्राईम ब्रांचचे पथक चौकशीसाठी घरी पोहचले आहे. दिल्लीचे सरकार पाडण्यासाठी भाजपने आपचे (AAP) आमदार (MLA) फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला होता. दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी (Delhi Crime Branch) अरविंद केजरीवाल यांना नोटीस देण्यासाठी शुक्रवारी त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळेस केजरीवाल निवास्थानी नव्हते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावत त्यांनी भाजपवर केलेल्या आरोपाचे पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. मंत्री आतिशी मार्लेना यांच्या घरी दिल्ली क्राइम ब्रांचचे एक पथक गेले होते. मात्र ते घरी उपस्थित नव्हते.

भाजपने आपचे आमदार फोडले, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आतिशी मार्लेना यांनी केला होता. त्यांनी हा दावा कोणत्या आधारावर केला हे दिल्ली क्राइम ब्रँच पथकाला जाणून घ्याचे आहे. भाजपने आपचे आमदार फोडले हे याचा आरोप कोणत्या आधारावर केला याची सध्या दिल्ली पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. आरोपाचे समर्थन करणारे पुरावे द्या? काही पुरावे असल्यास गुन्हे शाखेला द्या, त्यांची चौकशी केली जाईल, असे दिल्ली क्राईम ब्रँचकडून सांगण्यात आले आहे. मागील आठवड्यात अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दावा केला होता, आपच्या ७ आमदारांनी भाजपसोबत संपर्क साधला होता. त्यानंतर भाजपने हे आरोप निराधार असल्याचे ठरवून दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. या प्रकरणाचा सध्या तपास केला जात आहे.

हे ही वाचा:

घरोघरी मातीच्या चुली मालिकेतून रंग माझा वेगळा फेम दीपा झळकणार नव्या भूमिकेत

इतके धिंडवडे निघालेला आपला महाराष्ट्र कधी नव्हता – VIJAY WADETTIWAR

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss