Friday, April 19, 2024

Latest Posts

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यापालांकडे सुपूर्द केला राजीनामा, नव्या सरकारचा शपथविधी आजच होणार

काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत.

काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा राज्यापालांकडे सुपूर्द केला आहे.तसेच आज भाजप (BJP) आणि जेडीयूच्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयूचे सरकार सत्तेमध्ये होत. पण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय नितीश कुमार यांनी घेतला आहे. तसेच आज नितीश कुमार यांच्यासोबत भाजपचे दोन नेते सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सुशील मोदी आणि रेणू देवी हे भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये सुद्धा सत्तापालट होणार आहे. आता नितीश कुमार हे ९व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत ९ मंत्री शपथविधी घेणार आहेत. त्यामुळे आता बिहारच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. बिहारचे प्रभारी विनोद तावडे हे देखील बिहारमध्ये पोहचले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे बिहारमध्ये पोहचणार असल्याची शक्यता आहे. राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी आपली प्रतिक्रिया मांडली. बोलताना ते म्हणाले, महाआघाडीमध्ये परिस्थिती योग्य नव्हती. बरीच काम राज्यात होत नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच आता आम्ही इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार आहोत.

बिहार विधानसभा ही २४३ सदस्यांची आहे. विधानसभेत २४३ आमदार आहेत. २०२० मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत लालूंचा आरजेडी हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी आरजेडीला ७९ जागा मिळाल्या होत्या. सध्याच्या महायुतीमध्ये तिसऱ्या स्थानावर जेडीयू अर्थात नितीश कुमार यांच्या पक्षाचे ४५ आमदार आहेत.

हे ही वाचा:

Shivsena Uddhav Thackeray Group: देश हुकूमशाहीच्या वळणावर असताना…

थंडीच्या दिवसांत आल्याचा चहा किंवा आल्याचे पाणी पिल्याने शरीराला होतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss