Tuesday, April 16, 2024

Latest Posts

Shivsena Uddhav Thackeray Group: देश हुकूमशाहीच्या वळणावर असताना…

आमदार अपात्रता निकाल त्यानंतर जनता न्यायालय आणि त्यानंतर नाशिकचा दोन दिवसीय दौरा आणि सभा या महत्त्वपूर्ण घटना झाल्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मिडीयावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना या ट्विटर हॅन्डलवरून एक पोस्ट शेयर करण्यात आली आहे. ज्यात त्यांनी २०२४ आणि आगामी निवडणूक याबद्दल भाष्य केले आहे. आपण आपल्या एकीचं बळ दाखवूया, आणि लढून जिंकूया, असा विश्वास त्यांनी पोस्टद्वारे व्यक्त केला आहे. या आशयासोबत त्यांनी हे वर्ष आपलेच असल्याचा दावा यातून त्यांनी दाखवला आहे.

काय आहे पोस्ट? 

२०२४…निवडणुकीचं वर्ष, देशाच्या भविष्याला आणि राजकारणाला दिशा देणारं वर्ष!

देश हुकूमशाहीच्या वळणावर असताना, एक सामान्य नागरिक म्हणून आता आपल्याला देशाचं भविष्य घडवायचंय. कोणत्याही ‘महाशक्ती‘ला अस्मान दाखवण्याची ताकद आपल्या एकजुटीमध्ये आहे. हे एकीचं बळ दाखवूया, लढूया आणि जिंकूया!

हे वर्ष आपलंच आहे!

सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट, ४ आणि ५ फेब्रुवारीला दौऱ्याचे नियोजन 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग (SINDHUDURG) आणि रत्नागिरीच्या (RATNAGIRI) दौऱ्यावर असणार आहेत. दोन दिवसीय या दौऱ्यात स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांसोबत आगामी निवडणुकीची रणनीती उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERAY) तयार करणार आहेत. एकनाथ शिंदे (EKNATH SHINDE) यांची शिवसेना (SHIVSENA) आणि नारायण राणे (NARAYAN RANE) यांच्या मतदार संघावर उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी उद्धव ठाकरे भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. यासोबतच, ४ फेब्रुवारी रोजी सिंधूदुर्गातील जनतेशी संवाद साधून सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहे. तर ५ फेब्रुवारी रोजी बारसु याठिकाणी भेट देणार आहेत. यावेळी पत्रकार परिषद घेण्यात येईल आणि त्यांनतर, दौरा संपवून वंदे भारत रेल्वेने (VANDE BHARAT RAILWAY) उद्धव ठाकरे प्रवास करून मुंबईत दाखल होणार आहेत.

हे ही वाचा:

गोदा पट्ट्यातील आंदोलकांसाठी मनोज जरांगेंनी बोलवली बैठक

क्राउडफंडिंग मोहिमे अंतर्गत देणगी देणाऱ्यांना मिळणार राहुल गांधींची सही असलेलं टी-शर्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss