Saturday, July 27, 2024

Latest Posts

भाजप खासदार Unmesh Patil करणार शिवसेनेत प्रवेश? Sanjay Raut यांची निवासस्थानी घेतली भेट

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीला आता सुरुवात झाल्याचे दिसत आहे. देशात लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांसाठी सत्ताधारी आणि मित्रपक्ष तसेच विरोधक आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्यामध्ये वाटाघाटी सुरु झाल्या आहेत. काही मतदारसंघांमध्ये निवडणुकांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले असले तरीही काही मतदारसंघांमध्ये जागावाटपावरून तिढा कायम राहिला आहे. अश्यातच, जळगावचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमुळे उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उन्मेष पाटील हे जळगावमधील भाजपचे विद्यमान खासदार आहेत. परंतु, भाजपकडून यावेळी त्यांचे लोकसभा तिकीट कापण्यात आले. भाजपने उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना जळगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यामुळे, नाराज झालेले उन्मेष पाटील आपल्या पत्नीसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अश्यातच, त्यांनी मंगळवारी, (२ एप्रिल) शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांची त्यांच्या ‘मैत्री’ निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे, ते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार याची शक्यता वाढली असल्याचे बोलले जात आहे.

उन्मेष पाटील यांनी संजय राऊत यांची भेट घेऊन शिवसेना पक्षप्रवेशाबद्दल प्राथमिक चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे. भाजपने जळगाव मतदारसंघातून स्मिता वाघ यांना लोकसभेचे तिकीट दिल्याने ते नाराज झाले आहेत. त्यामुळे, उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना लोकसभा उमेदवारीसाठी शिवसेनेतून तिकीट देणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात, संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “ते आमच्या पक्षात प्रवेश करणार कि नाही माहित नाही. पण, त्यांनी आमच्याकडे वेळ मागितला आहे.” या भेटी दरम्यान उन्मेष पाटील यांच्या सोबत पारोळाचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार तसेच, जळगावचे शिवसेना (ठाकरे गट) संपर्कप्रमुख संजय सावंत हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे,आता उन्मेष पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार कि नाही हे लवकर निश्चित होईल.

हे ही वाचा:

Kejriwal यांना कोर्टाचा दणका, सुनावली १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Ramesh Baraskar यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, माढा मतदारसंघात तिरंगी लढत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss