दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (Aam Admi Party) अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी अजून वाढल्या आहेत. ईडीच्या (Enforcement Directorate) (ED)कोठडीत असलेल्या केजरीवाल यांना राउज अवेन्यू कोर्टाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली आहे. आज सोमवार, (१ एप्रिल) केजरीवाल यांची ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले गेले. विशेष न्यायाधीश कावेरी बाजवा यांच्यासमोर केजरीवाल यांची सुनावणी पार पडली. यावेळी, ईडीने केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार, कोर्टाने केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पंतप्रधान मोदींवर केजरीवाल यांचा घणाघात
अरविंद केजरीवाल यांना न्यायालयात हजर केले जात असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर घणाघात केला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “प्रधानमंत्री जे करत आहेत ते देशासाठी योग्य नाही आहे.”
केजरीवाल चौकशीला सहकार्य करत नाहीत, ईडीचा आरोप
न्यायालयीन सुनावणीदरम्यान ईडीकडून अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. ईडीच्या चौकशीदरम्यान अरविंद केजरीवाल हे सहकार्य करत नाहीत, असा आरोप ईडीने यावेळी केला. अरविंद केजरीवाल हे चौकशी दरम्यान दिशाभूल करत आहेत, असा आरोप ईडीने केला. यानुसार, कोर्टाने केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, केजरीवाल यांना तिहार तुरुंगात हलवण्यात येणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना दिल्ली एक्साईज पॉलिसी घोटाळ्याप्रकरणी (Delhi Exice Policy Scam) ईडीकडून अटक करण्यात आली होती. २१ मार्च रोजी त्यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर, केजरीवाल यांना सहा दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवणियात आले होते. २८ मार्च रोजी त्यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली होती. आता, त्यांना थेट १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या अगोदर आम आदमी पक्षाच्या तीन नेत्यांना दिल्ली एक्साईज पॉलिसी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आप नेते सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक करण्यात आली होती. सध्या त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले असून त्यांची चौकशी चालू आहे.
हे ही वाचा:
Ramesh Baraskar यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, माढा मतदारसंघात तिरंगी लढत
महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेचा प्रतिनिधी म्हणून…काय म्हणाले ROHIT PAWAR?
Follow Us