Wednesday, May 1, 2024

Latest Posts

Eknath Shinde यांच्या Shivsena कडून आचारसंहिता भंग, Congress ची EC कडे तक्रार

उद्यापासून लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) धुरळा उडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला उद्या (शुक्रवार, १९ एप्रिल) सुरुवात होणार असून राज्यभर विविध पक्षांच्या प्रचारसभा होत आहेत. पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह असून आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करण्यात येत आहे. अश्यातच आता काँग्रेसकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला असून तशी रीतसर तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी याबाबत बोलताना सांगितले, “लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे व त्याबाबतची रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहीरातबाजी करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा.” अतुल लोंढे यांनी याबाबत राज्य निवडणूक अधिकारी यांना पात्र पाठवून याची रीतसर तक्रार केली आहे.

राज्य निवडणूक अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात अतुल लोंढे म्हणतात की, “निवडणूक आयोगानुसार, निवडणूक प्रचारासाठी सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमांच्या मालमत्तांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे, अशा आशयाचे पत्र सर्व राज्यांचे कॅबिनेट सचिव, मुख्य सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उद्देशून पाठवलेले आहे. बंदी असतानाही एसटीच्या अधिकाऱ्यांनी १००० हून अधिक बसेस शिवसेना उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी अवैधपणे वापरास परवानगी दिली आहे. एसटी महामंडळाच्या या बसेसवर शिवसेना बॅनर लावून निवडणूक प्रचार करत आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे फोटो आणि शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह स्पष्टपणे दाखवण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे हे कृत्य केवळ आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन करत नाही तर निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षता आणि अखंडतेला बाधा आणणारे आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी,” असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

अब कि बार Sunetra Pawar, Baramati मधून Eknath Shinde यांची घोषणा

Baramati मध्ये इतिहास घडणार, Sunetra Pawar दिल्लीत जाणार, Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss