तुम्हाला माहित आहे का Express Train ची नावं कशी व कोणाकडून दिली जातात; जाणून घ्याबद्दल संपूर्ण माहिती

भारतीय रेल्वे ही भारतीय जनतेसाठी एक प्रकारची लाईफलाईनच (Lifeline) आहे. दररोज लाखो लोक रेल्वेचा उपयोग करून प्रवास करतात. भारतीय रेल्वेचे जाळे हे अगदी मोठमोठ्या शहरांपासून ते गावागावात पसरले आहे.

तुम्हाला माहित आहे का Express Train ची नावं कशी व कोणाकडून दिली जातात; जाणून घ्याबद्दल संपूर्ण माहिती

भारतीय रेल्वे ही भारतीय जनतेसाठी एक प्रकारची लाईफलाईनच (Lifeline) आहे. दररोज लाखो लोक रेल्वेचा उपयोग करून प्रवास करतात. भारतीय रेल्वेचे जाळे हे अगदी मोठमोठ्या शहरांपासून ते गावागावात पसरले आहे. म्हणून माध्यमवर्गीयांपासून ते उच्चवर्गीय लोकं हे रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. भारतीय रेल्वेने जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्क्सच्या यादीत आपले स्थान पटकावले आहे. रेल्वेचा प्रवास हा अगदी सुखकर व आरामदायी असतो. रेल्वेने प्रवास केल्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्याचप्रमाणे रेल्वे मधून प्रवास करताना आपल्याला अनेक सुख सुविधांचा लाभ घेता येतो. म्हणूनच ट्रेनने प्रवास करण्यास लोक जास्तीत जास्त भर देताना आपल्याला दिसून येतात. आणि याच कारणामुळे भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुखसोयी साठी रेल्वेच्या अनुधिकारणावर चांगलेच लक्ष देत आहे. तसेच आपल्या भारतीय रेल्वे मध्ये अजून काही लग्झरी ट्रेन्स (luxury train) दाखल होताना आपल्याला दिसून येत आहे.

भारतीय रेल्वेचे जाळे गावागावात पसरले आहे. जास्तीत जास्त लोकांना रेल्वेचा लाभ घेता यावा यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच कार्यरत असते. काही ट्रेन्स या राज्यातल्या राज्यात प्रवाशांना सेवा देण्याचे काम करतात. तर काही ट्रेन्स या एक राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सेवा पुरवण्याचे काम करत असतात. अश्या या प्रवाशांना सुखरूप त्यांच्या निश्चित स्थळी पोहचवणाऱ्या भारतीय रेल्वेला नावे दिली गेली असतात. रेल्वेला प्रामुख्याने भारतातील प्रसिद्ध नद्यांवरून, धार्मिक स्थळांवरून नावे दिली जातात. काशी विश्वनाथ एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, गरिबरथ एक्सप्रेस अशी काही भारतातील प्रसिद्ध ट्रेन्सची नावे आहेत.

भारतीय रेल्वेचे राजधानी हे नाव भरपूर प्रसिद्ध आहे. या ट्रेनची खासियत लक्षात ठेवून या ट्रेनला हे नाव दिले गेले आहे. जी ट्रेन दोन राज्यांच्या राजधान्या जोडते त्यांना राजधानी एक्सप्रेस म्हणतात. भारतातील काही उत्तम दर्जाच्या ट्रेन्स मध्ये या राजधानी एक्सप्रेसचे नाव आवर्जून घेतले जाते. राजधानीप्रमाणेच शताब्दी एक्सप्रेस हे सुद्धा एक प्रसिद्ध नाव आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुं यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त शताब्दी एक्सप्रेस सुरु केली गेली म्हणूच तिला शताब्दी एक्सप्रेस हे नाव दिले गेले आहे.

हे ही वाचा:

Car Care Tips: गाडी मधून येतोय विशिष्ट प्रकारचा वास?

पुण्यातल्या पोटनिवडणुकीच्या जागेवरून नाना पाटोले आणि अजित पवार आमने सामने

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version